पिंपरीत पोलिसांनाच दाखवली पोलिसी खाकी, भर उन्हात दिली शिक्षा

पिंपरीत पोलिसांनाच दाखवली पोलिसी खाकी, भर उन्हात दिली शिक्षा

कामचुकारपणा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना भर उन्हात कवायती करण्याची शिक्षा देण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी आपल्याच कर्मचाऱ्यांना पोलिसी खाक्याचं दर्शन घडवलं आहे.

  • Share this:

गोविंद वाकडे, प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड, 16 मार्च : पुणे तिथे काय उणे या म्हणीचं उदाहरण पुणेकरांनी आपल्याला वारंवार दिलं आहे. पण पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये काही वेगळाच प्रकार पहायला मिळाला. पिंपरीमध्ये गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे पिंपरीत स्थानिक नागरिकांमध्ये कायम भीतीचं वातावरण असतं. पण अशाच पोलीस मात्र हातावर हात ठेऊन बसले आहेत. अशाच सुस्त पोलिसांना जागं करण्यासाठी त्यांनाच पोलीस स्टेशन दाखवण्यात आलं आहे.

कामचुकारपणा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना भर उन्हात कवायती करण्याची शिक्षा देण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी आपल्याच कर्मचाऱ्यांना पोलिसी खाक्याचं दर्शन घडवलं आहे.

शहरात घडलेल्या एखाद्या घटनेची माहिती घेण्यासाठी वेळेत न पोहचणं, हेल्प लाईनवर आलेल्या फोन कॉल्सना योग्य प्रतिसाद न देणं, ड्युटीवर वेळेत न पोहचणं, ड्युटीवर असतांना कामाकडे दुर्लक्ष करणं आणि वरिष्ठांच्या आदेशाचं पालन न करणं असे आरोप असलेल्या या कामचुकार पोलिसांना शिक्षा देण्यात आली आहे.

पोलीस आयुक्तांकडून केल्या गेलेल्या शिक्षेमुळे सर्व कर्मचारी काहीसे ओशाळलेले होते. मात्र, कर्मचाऱ्यांना पोलीस दलातील शिस्तीचा विसर पडू नये आणि त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर करू नये यासाठी ही शिक्षा दिल्याचं आयुक्त आर. के .पद्मनाभन यांनी म्हटलं आहे.

सध्या रोज म्हटलं तरी पिंपरीमध्ये गुन्ह्याचे प्रकार घडतात. त्यामुळे सामान्य नागरिक आपला जीव मुठीत घेऊन घराबाहेर पडतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांनी चोख बजावणं आवश्यक आहे. त्यासाठी आता पोलिसांनाच पोलिशी खाकी दाखवली गेली. पण त्याचा काही फायदा होणार का हेच पाहणं महत्त्वाचं आहे.

VIDEO : अजित पवारांची सुजय विखेंवर टीका

First published: March 16, 2019, 5:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading