उत्तर प्रदेशातून विमानाने मुंबईत येऊन चोरी करणारा हायटेक भामटा जेरबंद

उत्तर प्रदेशातून विमानाने मुंबईत येऊन चोरी करणारा हायटेक भामटा जेरबंद

तो विमानाने मुंबई, पुण्यात येऊन भर दिवसा घरफोड्या करायचा आणि मुद्देमाल घेऊन परत उत्तर प्रदेशात जात असे.

  • Share this:

गोविंद वाकडे, पुणे 21 ऑगस्ट : चोरी करणारा चोर काय शक्कल लढवेल हे काही सांगता येत नाही. या आधी चोरांनी कॉर्पोरेट स्टाईल ने चोरी करणारी चोरांची टोळीही उघडकीस आली होती. पिंपरी चिंचवड पोलिसांनी अशाच एका हायटेक भामट्याला अटक केलीय. मुंबई, पुण्यात चोरी करण्यासाठी तो खास विमानाने यायचा आणि चोरी करून पुन्हा विमानाने परत उत्तर प्रदेशात जात होता. हा भामटा CCTVमध्ये कैद झाल्याने त्याचे बिंग फुटले आणि तो पोलिसांच्या तावडीत सापडला. त्याचे कारनामे पाहून पोलिसही चक्रावून गेले आहेत.

अनिल राजभर असं या भामट्याचं नाव आहे. तो विमानाने मुंबई, पुण्यात येऊन भर दिवसा घरफोड्या करायचा. त्याच्याकडून 25 तोळे सोनं आणि लॅपटॉप हस्तगत करण्यात आलेत. उत्तर प्रदेशातून तो विमानाने मुंबई किंवा पुण्यात यायचा, आलिशान हॉटेलमध्ये तीन ते चार दिवस रहायचा. मग रेकी करून तो बंद घरावर डल्ला मारायचा अशी त्याची मोड्स ऑपरेंडी होती.

पूरग्रस्तांची थट्टा! मदतीसाठी दिलेले पैसे पोलीस बंदोबस्तात केले पुन्हा वसूल

चोरीत त्याला जे दागिने मिळायचे तो त्या दागिण्यांची त्याच शहरात विक्री करायचा आणि पैसे घेऊन पुन्हा उत्तर प्रदेशात जात असे. मुंबई आणि पुण्यात असे यापूर्वी चार गुन्हे दाखल झाले आहेत. त्याच्या दुर्दैवाने पिंपरी चिंचवडमधील घरफोडी करतेवेळी तो सीसीटीव्हीत कैद झाला अन त्याचं बिंग फुटलं. वाकड पोलिसांनी त्याच्या कारनाम्यांचा पर्दाफाश करण्यासाठी तीन खास पथकं तैनात केली आहेत.

खबरदार! गणेशोत्सवात वर्गणीसाठी जबरदस्ती केली तर खंडणीचा गुन्हा लागणार

राजभरची काही टोळी आहे का याचा छडाही पोलीस लावणार आहेत. मुंबई, पुणे आणि देशातल्या इतर शहरांमध्येही त्याने चोऱ्या केल्यात का याचाही शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे. पोलिसांचं एक पथक उत्तर प्रदेशातही जाणार असून तिथेही तपास करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 21, 2019 09:45 PM IST

ताज्या बातम्या