निवडणुकीच्या तोंडावर पिंपरीत 2 गुन्हेगारांना अटक; गावठी रिव्हॉल्व्हर, जिवंत काडतुसं जप्त

सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. या गुन्हेगारांसह गावठी रिव्हॉल्व्हर आणि 3 जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत.

News18 Lokmat | Updated On: Sep 30, 2019 02:07 PM IST

निवडणुकीच्या तोंडावर पिंपरीत 2 गुन्हेगारांना अटक; गावठी रिव्हॉल्व्हर, जिवंत काडतुसं जप्त

अनिस शेख, प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड, 30 सप्टेंबर : पिंपरी-चिंचवड शहरात दहशत माजवण्यासाठी रावण टोळी या नावाने प्रसिद्ध असलेल्या टोळीतील जवळपास 13 गुन्हेगारांवर यापूर्वी पोलिसांनी कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. आता या टोळीतील 2 सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. या गुन्हेगारांसह गावठी रिव्हॉल्व्हर आणि 3 जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा प्रकार घडल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.

पिंपरी चिंचवड शहरात सध्या रावण टोळीचा दरारा कमी झाला आहे. शहरात आपली वचक पुन्हा निर्माण करण्यासाठी रावण टोळीतील सराईत गुन्हेगार देहूरोड शहराच्या हद्दीत रिवॉल्वर घेऊन फिरत असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांमार्फत पोलिसांना मिळाली.

पोलीस आयुक्तालयात नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत पोलिसांना सण-उत्सव आणि निवडणूक काळात सतर्क राहून गुन्हेगारांवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना पोलीस आयुक्त संदीप बिश्नोई यांनी सर्व पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्या अनुषंघाने पोलिसांनी सापळा रचत रावण टोळीतील सक्रिय सदस्य प्रसन्ना पवार याला देहूरोड इथल्या अमराई मंदिरातून ताब्यात घेत त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक गावठी रिव्हॉल्व्हर तसेच एक जिवंत काडतूस आढळून आले.

इतर बातम्या - राष्ट्रवादीला मोठा धक्का, तिकीट दिलेल्या महिला उमेदवार करणार भाजपमध्ये प्रवेश

Loading...

दुसरा साथीदार कीन्हई गावात रिव्हॉल्व्हर घेऊन वावरत असल्याची खात्रीलायक माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हितेश काळे याला ताब्यात घेत याच्याकडून एक गावठी रिव्हॉल्व्हर तसेच दोन काडतूस जप्त केली. या दोन्ही सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. न्यायालयाने या दोघांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

इतर बातम्या - BREAKING: जलसंधारण मंत्र्यांच्या गाडीने तरुणाला चिरडलं, जागीच मृत्यू

मागील 15 दिवसात देहूरोड शहर पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांकडून रिव्हॉल्व्हर हस्तगत करण्याची ही तिसरी घटना आहे. पोलिसांकडून सुरू असलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे सध्या पोलीस ऍक्टिव्ह मोडवर असल्याचं सर्वसामान्य नागरिकांना जाणवू लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: crime news
First Published: Sep 30, 2019 12:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...