पुण्यातील धक्कादायक VIDEO, कारला अडवलं अन् घात झाला, वाहतूक पोलिसाला नेलं फरफटत

पुण्यातील धक्कादायक VIDEO, कारला अडवलं अन् घात झाला, वाहतूक पोलिसाला नेलं फरफटत

या प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला तातडीनं बेड्या ठोकल्या आहेत.

  • Share this:

पिंपरी-चिंचवड, 6 नोव्हेंबर : अनेकदा वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत आणि अशावेळी गाडी अडवणाऱ्या ट्रॅफिक पोलिसासोबत गैरवर्तन देखील केलं जात असल्याचं समोर आलं आहे. दिल्लीत भर वाहतूक कोंडीत वाहतूक पोलिसाला उडवून कारवरून घेऊन जात असलेल्या कारची घटना ताजी असतानाच आणखीन एक भयंकर प्रकार महाराष्ट्रात घडला आहे.

वाहतूक पोलीसाला एका कारनं धडक देत कारसोबत नेल्याची घटना पिंपरी-चिंचवड परिसरात घडली आहे. भरधाव कारच्या बोनेटवर वाहतूक पोलीस धडक दिल्यानं पडला आणि त्याच अवस्थेत कारचालकानं गाडी पुढे नेली. आजूबाजूच्या स्थानिक नागरिकांनी याचा व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. तर या प्रकरणी कार चालकाविरोधात पिंपरी-चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचा-सॅल्युट! रुग्णवाहिकेत तडफडत होता जीव; वाचवण्यासाठी ट्रॅफिकमध्ये धावत सुटला पोलीस

हा व्हिडीओ पिंपरी चिंचवड परिसरातील गुरुवारचा असल्याची माहिती मिळाली आहे. वाहतूक पोलिसानं भरधाव कार अडवण्याचा प्रयत्न केल्यानं या कर्मचाऱ्याला कार चालकानं कार न थांबवता धडक देऊन बोनेटवरून खेचत नेलं. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला तातडीनं बेड्या ठोकल्या आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली. काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या वाहतूक कोंडीमध्ये असाच एक प्रकार घडला होता आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 6, 2020, 8:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading