मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याला कोरोनाची लागण, ड्रायव्हरसह 11 जण पॉझिटिव्ह

पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याला कोरोनाची लागण, ड्रायव्हरसह 11 जण पॉझिटिव्ह

नगरसेवकाच्या संपर्कात आलेल्या सहकारी चालकासह त्याच्या कुटुंबियातील 11 जणांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.

नगरसेवकाच्या संपर्कात आलेल्या सहकारी चालकासह त्याच्या कुटुंबियातील 11 जणांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.

नगरसेवकाच्या संपर्कात आलेल्या सहकारी चालकासह त्याच्या कुटुंबियातील 11 जणांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.

पिंपरी चिंचवड, 26 जून : पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीचे माजी विरोधीपक्ष नेते आणि विद्यमान नगरसेवकाला कोरोनाची लागण झाल्याचं स्पस्ट झालं आहे. संबधित नगरसेवकाच्या संपर्कात आलेल्या सहकारी चालकासह त्याच्या कुटुंबियातील 11 जणांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. तर नगरसेवकासह सगळ्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे या नगरसेवकाच्या नेहमीसोबत असणाऱ्या सहकारी चालकासोबत त्या चालकाच्या कुटुंबातील 11 जणांना कोरोनाची लागण झाल्याची बाबही समोर आली आहे. लॉकडाऊनच्या काळात आणि सद्य परिस्थितीतही शेकडो नागरिकाना अन्नधान्य वाटप करत असल्याने आपण अनेकांच्या संपर्कात आलो होतो. त्याच बरोबर महापालिकेतील सर्वसाधारण सभेलाही उपस्थित होतो. त्यामुळे त्यांच्या संपर्कात येणाऱ्या सर्वांची चाचणी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातील शहीद वीरपुत्रांवरून शिवसेनेची भाजपवर जहरी टीका, म्हणाले...

दोन दिवसांपूर्वी या नगरसेवकाला घशात खव-खव होत होती आणि श्वास घ्यायला त्रास होत असल्यानं त्यांनी आपल्या सहकाऱ्यासह सर्वांची कोव्हिड टेस्ट केली. काल रात्री त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आणि त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

या आधी चिंचवड परिसरातील सत्ताधारी भाजपच्या एका नगरसेविकेसह त्यांच्या कुटुंबातील 8 जणांना तर दापोडी परिसरातील राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकासह त्यांच्या कुटुंबातील 6 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

दरम्यान, अनलॉक-1 ची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सर्वच शहरांमधील लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली जात आहे. यामुळे नागरिकांना बाहेर पडणं शक्य होतं आहे. मात्र त्याचवेळी आता पुणे, पिंपरी-चिंचवड या भागातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

इंदुरीकर महाराजांच्या अडचणी वाढल्या, 'त्या' विधानावरून अखेर गुन्हा दाखल

वारंवार सांगूनही बाजारपेठेमध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि सम विषम पद्धतीने दुकाने सुरू ठेवण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचं पालन होत नसल्याने आता अखेर पुढील 3 दिवसांसाठी शहरातील मुख्य बाजारपेठ पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकारी आणि सहायक आयुक्त स्मिता झगडे यांनी याबाबतचा आदेश काढला आहे.

Coronavirus in India: 24 तासांत कोरोनाचा कहर, आजची धक्कादायक आकडेवारी समोर

संपादन - रेणुका धायबर

First published:

Tags: Corona, Corona symptoms, Corona virus