मराठी बातम्या /बातम्या /पुणे /आधुनिक यशोदा! पिंपरी चिंचवडमधील मातेने स्वतःच तब्बल 98 लिटर दूध केलं दान; म्हणाल्या महिलांची फिगर..

आधुनिक यशोदा! पिंपरी चिंचवडमधील मातेने स्वतःच तब्बल 98 लिटर दूध केलं दान; म्हणाल्या महिलांची फिगर..

आधुनिक यशोदा!

आधुनिक यशोदा!

पिंपरी चिंचवड मधील एका मातेने दोन वर्षात स्वतःच तब्बल 98 लिटर दूध दान केलं आहे. यशोदा मिल्क बँकेकडून आईचं दूध संकलन करण्याचा कार्यक्रम राबवला जातो.

गोविंद वाकडे, प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड, 21 मे : प्रत्येक बाळासाठी आईचं दूध म्हणजे अमृत असते. मातेचे दूध नवजात अर्भकाला सर्वोत्तम पोषण तसेच आजार आणि संसर्गांपासून संरक्षण देत असते. या संकल्पनेतून ‘यशोदा मिल्क बँक'ने मागील 15 वर्षात 43 लाख मिलीलिटर दुध संकलन केलं आहे. या बँकमध्ये मातेचे दूध दात्यांकडून संकलित केले जाते आणि गरजू नवजात अर्भकांसाठी संरक्षित केले. याच बँकेत पिंपरी चिंचवड मधील एका मातेने तब्बल 98 लिटर दूध दान केलं आहे.

रत्ना जैन असं या मातेचं नावं आहे. रत्ना यांनी 2 वर्षात 98 लिटर दूध दान केल आहे. त्यामुळे त्यांना आधुनिक यशोदा म्हटल जात आहे. दूध दान केल्याने किंवा पाजल्याने महिलांची फिगर बिघडते हा गैरसमज असल्याचंही रत्ना म्हणाल्या. रत्ना जैन असं या मातेचं नावं आहे. रत्ना यांनी 2 वर्षात 98 लिटर दूध दान केल आहे. त्यामुळे त्यांना आधुनिक यशोदा म्हटल जात आहे. दूध दान केल्याने किंवा पाजल्याने महिलांची फिगर बिघडते हा गैरसमज असल्याचंही रत्ना म्हणाल्या. रत्ना जैन यांची सातव्या महिन्यातच डिलिव्हरी झाली होती. त्यामुळे त्यांच्या   बाळाला अतिदक्षात विभागात ठेवण्यात आलं होतं. अशा परिस्थितीत त्यांनी आपल्या दूध दानाचं कार्य सुरूच ठेवलं आणि दोन वर्षात पुण्यातील केईएम त्याचबरोबर पिंपरीतील यशोदा मिल्क बँकेमध्ये दूध दान करत राहिल्या. हे काम पुण्याचं आहे, असं त्यांना वाटतं आणि दूध दान करून मिळवलेल्या पुण्यामुळेच सातव्या महिन्यात डिलिव्हरी होऊनही त्यांची मुलगी जी अवेळी  डिलिव्हरीतून जन्माला आली ती सुखरूप बचावली  असं त्या म्हणतात.

तर रत्ना यांच्या प्रमाणेच 15 हजार मातांकडून पिंपरी चिंचवडमधील यशोदा मिल्क बँकने मागील दहा वर्षात तब्बल 43 लाख मिलीलिटर दूध संकलित केलं. हे दान केलेले हे दूध 23 हजार गरजू बालकांना मोफत देण्यात आलं आहे. नवजात शिशुंना आईच दूध न मिळाल्यास त्यांची प्रतिकार शक्ती कमी होऊन तो अनेक आजारांना बळी पडतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. तर पिंपरीतील नवविवाहीत तरुणींनी मातांना दूध दान करण्याचं आवाहनन करत स्वतःही आपलं दूध दान करत असल्याने त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.

आईकडून नवजात बाळाला दूध पुरेश्या प्रमाणात न मिळणे, वैद्यकीय गंभीर स्थितीत दुधाची कमतरता भासणे, आईकडून बाळाला दूध न मिळणे तसेच बाहेर जन्मलेल्या बाळासाठी आणि कामावर जाणाऱ्या मातांच्या बाळासाठी यशोदा मिल्क बँक एक वरदान ठरले आहे. ही सेवा मोफत उपलब्ध असून गेल्या 15 वर्षांपासून अव्याहतपणे सुरू आहे. मिल्क बँकमुळे नवजात बालकांमधील जंतुसंसर्गाचे प्रमाण 30 टक्केवरून 5 टक्केपर्यंत कमी करण्यात यश मिळाले आहे. दुधाची गुणवता, तपासणी, शुद्धीकरण, साठवण क्षमता आणि त्याचे व्यवस्थापन, संगणकीय तंत्रज्ञान आदी विकसित करण्यात आले असून प्रगत उपकरणाचा यात समावेश आहे.

First published:
top videos

    Tags: Pune