भाजप नेत्यांना पिस्तूल लागतेच कशाला? पुण्यात भरदिवसा हवेत गोळीबार

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपचे महापौर राहुल जाधव यांनी बुधवारी भरदिवसा हवेत गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 7, 2019 09:08 PM IST

भाजप नेत्यांना पिस्तूल लागतेच कशाला? पुण्यात भरदिवसा हवेत गोळीबार

गोविंद वाकडे, (प्रतिनिधी)

पिंपरी चिंचवड, 7 ऑगस्ट- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपचे महापौर राहुल जाधव यांनी बुधवारी भरदिवसा हवेत गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे महापौरांनी हा 'प्रताप' केला, त्यावेळी राष्ट्रवादीचे विरोधीपक्ष नेते नाना काटे आणि महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे गटनेते सचिन चिखले तसेच महापालिकेतील अधिकारीही उपस्थित होते. दरम्यान, गोळीबार केल्याचे वृत्त राहुल जाधव यांनी फेटाळले आहे.

मिळालेली माहिती अशी की, महापौर जाधव हे बुधवारी सकाळी पवना धरणाच्या जलपूजनासाठी मावळमध्ये गेले होते. जलपूजन झाल्यानंतर ते जवळच असलेल्या स्वर्ग हॉटेलवर जेवायला थांबले. तिथेच महापौरांनी हा 'उद्योग' केल्याची माहिती समोर आली आहे. महापौरांनी अतिउत्साहात हवेत दोन राउंड फायर केले. सुसंस्कृत म्हणवणाऱ्या भाजपच्या नेत्यांना पिस्तूल लागतेच कशाला? त्यात ते अशा पद्धतीने भरदिवसा हवेत गोळीबार करणार असतील तर त्यांना यातून जनतेला काय संदेश द्यायचा आहे. महापौर राहुल जाधव स्वतःला वारकरी आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचे पाईक मानतात तर त्यांना असा प्रताप करायची गरज काय, असा सवाल जनमानसातून विचारला जात आहे.

गोळीबारावर काय म्हणाले महापौर?

मी कोणताही गोळीबार केलेला नाही. माझ्याकडे पिस्तूल आहे. त्याचा परवानाही आहे. काही लोकांनी विचारले म्हणून मी त्यांना पिस्तूल हातात दाखवले. मात्र, आपण हवेत गोळीबार केला नसल्याचे राहुल जाधव यांनी सांगितले आहे. याबाबत होणाऱ्या चौकशीला समोरे जाण्याची आपण तयार असल्याचेही जाधव यांनी म्हटले आहे.

Loading...

VIDEO:आता संसार कसा थाटायचा, कसं जगायचं? वृद्ध दाम्पत्याला कोसळलं रडू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 7, 2019 09:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...