पिंपरी चिंचवड, 2 डिसेंबर : पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या काही वर्षात गुन्हेगारीच प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. अगदी अल्पवयीन मुलांपासून गँगवारच्या घटनाही घडत आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरात टोळी युद्धाचा भडका उडाला असून काही वेळा पूर्वी घडलेल्या एका घटनेत एकाच गोळीबारात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. भरचौकात घडलेल्या या घटनेने पिंपरी चिंचवड शहर हादरलं आहे.
घटनेबद्दल मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पिंपरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रामनगर येथील परशुराम चौकात विशाल गायकवाड याचेवर काही अज्ञात आरोपींनी गोळीबार केला. त्यानंतर कोयत्याने वार करत त्याचं शीर धडावेगळं करण्याचाही प्रयत्न केला. दरम्यान घटनास्थळी पिंपरी चिंचवड पोलीस दाखल झाले असून, जुन्या वैमानस्यातून विशाल गायकवाड याचा प्रतिस्पर्धी टोळीतील आरोपींनी खून केला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुढील तपास सुरू आहे.
वाचा - संतापजनक! मुंबईत कोरियन मुलीच्या छेडछाडीनंतर गोव्यात विदेशी महिलेसोबत थेट..
काही महिन्यांपूर्वी गायकवाड टोळीवर मोक्काची कारवाई
काही महिन्यांपूर्वी विविध गुन्हे दाखल असलेल्या गणेश गायकवाड आणि नाना गायकवाड यांच्या टोळीवर तिसऱ्यांदा मोक्काची (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999) कारवाई करण्यात आली. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या टोळीवर मोक्कांतर्गत केलेली ही दुसरी कारवाई आहे. तर यापूर्वी या टोळीवर पुण्यात देखील मोक्काची कारवाई झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुनाचा प्रयत्न करणे, गुलाम बनविण्याच्या इराद्याने अपहरण करून मारहाण करणे, कट रचून बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक करणे, खंडणी उकळण्यासाठी मारहाण करणे, अनैसर्गिक संभोग करून खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा घालणे, असे एकूण 14 गुन्हे आरोपींच्या विरोधात पिंपरी - चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दाखल आहेत. आरोपींनी संघटित गुन्हेगारी टोळी बनवून वर्चस्वासाठी तसेच आर्थिक फायद्यासाठी हिंसाचाराचा वापर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.