पिंपरी चिंचवड: उच्चशिक्षित तरुणांकडून 150 किलो गांजा जप्त

पिंपरी चिंचवड: उच्चशिक्षित तरुणांकडून 150 किलो गांजा जप्त

योगेश हा इंजिनिअर असून सागर याने फार्मसीचं शिक्षण घेतलं आहे. विक्रीला आणलेला गांजा विशाखापट्टणम इथून आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

  • Share this:

गोविंद वाकडे, प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड, 02 मे : पिंपरी चिंचवड शहरात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या 2 उच्चशिक्षत तरुणांना अमली पदार्थ विरोधी पथकाने ताब्यात घेतलं आहे. तरुणांकडून तब्बल 35 लाख रुपयांचा 150 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी योगेश दत्तात्रेय जोध आणि सागर दिगंबर कदम या दोघांना ताब्यात घेतलं आहे.

योगेश हा इंजिनिअर असून सागर याने फार्मसीचं शिक्षण घेतलं आहे. विक्रीला आणलेला गांजा विशाखापट्टणम इथून आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे पिंपरीमध्ये तरुणाईला धोका असल्याचं स्पष्ट होतं. तर या प्रकारामुळे पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पोलीस निरीक्षक श्रीराम पौळसह त्यांचे सहकारी कर्मचारी गस्त घालत होते. पथकातील एका कर्मचाऱ्याला द्रुतगती मार्गावर गांजा विक्रीसाठी 2 इसम येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.

हेही वाचा : 'शरद पवारांना पंतप्रधानपदाचा लायक मानत नाही'

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बिटवाईज कंपणी इथे 2 इसम संशयितरित्या उभे होते. त्यांना चाहूल न लागता अमली पदार्थ विरोधी पथकातील कर्मचारी आणि अधिकाऱ्याने सापळा रचून त्या दोघांना ताब्यात घेतलं. पथकाडून आणि पोलिसांकडून आता या दोघांची कसून चौकशी करण्यात येत आहे.

दोन्ही तरुणांकडे असलेल्या 5 गोण्यांमध्ये ऐकूम 150 किलो वजनाचा गांजा सापडला. ज्याची किंमत 35 लाख 88 हजार आहे. दरम्यान, संबंधीत आरोपी हे उच्च शिक्षित असून त्यांच्याकडे अधिक तपास पोलीस करत आहेत.

या तरुणांकडून इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा आला कसा? या प्रकरणात कोणत्या मोठ्या टोळीचा हस्तक्षेप आहे का? हा गांजा नेमका कोणत्या ठिकाणी पोहचवला जात होता? अशा संपूर्ण प्रश्नांची उत्तरं आता पोलीस घेत आहेत. तर या सगळ्यातून तरुणाईला बाहेर काढण्याचं मोठं आव्हान पोलीस आणि पालकांसमोर आहे.

VIDEO : शिक्षक की हिटलर? विद्यार्थिनींना बेदम मारहाण

 

First published: May 2, 2019, 6:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading