पिंपरीमध्ये सोसायटीत सिलेंडरचा भीषण स्फोट, भिंती कोसळल्या; एकाचा मृत्यू

पिंपरीमध्ये सोसायटीत सिलेंडरचा भीषण स्फोट, भिंती कोसळल्या; एकाचा मृत्यू

घरगुती एलपीजी गॅस रात्रभर गळती होऊन तो घरभर पसरल्याने त्याचा सकाळी स्पार्क मिळताच स्फोट झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

  • Share this:

पिंपरी चिंचवड, 09 ऑगस्ट : पिंपरी चिंचवडमधील दिघा परिसरात एका घरात घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात एका जणाचा मृत्यू झाला आहे. तर 9 जण जखमी झाले आहे. यात एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

पिंपरी चिंचवडमधील दिघा परिसरातील  अष्टविनायक सोसायटीतही दुर्दैवी घटना घडली.  आज सकाळी 6.30 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. या सोसायटीतील  फ्लॅट क्रमांक 102 व 103 या दोन घरामध्ये  घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, अवघी सोसायटी जोरात हादरली. घरातील तीन भिंती आणि खिडक्यांना हादरा बसून कोसळल्या.

सुशांत प्रकरणात नेमके काय चुकले? संजय राऊतांनी पोलीस तपासावर ठेवले बोट!

स्थानिकांनी तातडीने पोलीस आणि अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर भोसरी अग्निशमन केंद्राचे एक व मुख्य अग्निशमन केंद्र पिंपरी या ठिकाणची दोन  वाहने घटनास्थळी त्वरित दाखल झाली.

याघटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर दोन घरातील एकूण 13 व्यक्ती जखमी झाले आहेत. यामध्ये तीन पुरुष तीन महिला दोन लहान मुल आणि पाच लहान मुली असे एकूण 13 जण जखमी झाले आहेत.  जखमींना स्थानिक लोकांनीच त्वरित डी वाय पाटील  रुग्णालयात हलविले होते.

घरगुती एलपीजी गॅस रात्रभर गळती होऊन तो  घरभर पसरल्याने त्याचा सकाळी स्पार्क मिळताच स्फोट झाला असावा, असा अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला.

जखमी व्यक्तींची नावे

1) ज्ञानेश्वर टेमकर वय 32 वर्षे

2) मंगला टेमकर वय 27 वर्ष

3) अनुष्का टेमकर वय 7वर्ष

4) यशश्री टेमकर 3 वर्ष

5) सातपुते

6) सातपुते व त्यांची 7)मुलगा व 8)मुलगी

9) महेंद्र सुरवाडे वय 40 वर्ष

10) अर्चना सुरवाडे वय 35 वर्ष

11) आकांक्षा सुरवाडे वय15 वर्ष

12) दीक्षा सुरवाडे वय 13 वर्ष

13) अमित सुरवाडे वय 8 वर्ष

असे एकूण 13 व्यक्ती जखमी झाल्याचे प्रथमदर्शी अहवालात अग्निशमन दलाला कडून नमूद करण्यात आले आहे.

Published by: sachin Salve
First published: August 9, 2020, 11:04 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading