फुरसुंगी आणि उरुलीदेवाच्या ग्रामस्थांनी काढली कचरा डेपोची अंत्ययात्रा

"फुरसुंगी आणि उरुलीदेवाची गावचे रहिवाशी श्रीयुक्त कचरा डेपो यांचे दुःखद निधन झाले आहे"

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 3, 2017 05:29 PM IST

फुरसुंगी आणि उरुलीदेवाच्या ग्रामस्थांनी काढली कचरा डेपोची अंत्ययात्रा

03 मे : "फुरसुंगी आणि उरुलीदेवाची गावचे रहिवाशी श्रीयुक्त कचरा डेपो यांचे दुःखद निधन झाले आहे. त्याचा अंत्यविधी मंतरवाड़ी फाटा येथे होणार आहे" अशी जाहीरातबाजी करत  उरुळीदेवाची आणि फुरसुंगी ग्रामस्थ आज कचराडेपोची अंत्ययात्रा काढली.

पुण्यात आज सलग 18 व्या दिवशीही कचरा कोंडीचा प्रश्न कायम आहे. कचराडेपोला आग लागली होती तेव्हापासून ग्रामस्थ आंदोलन करत आहेत. आज या फुरसुंगी आणि उरुलीदेवाच्या ग्रामस्थांनी अभिनव पद्धतीने आंदोलन करत थेट कचरा डेपोची अंत्ययात्रा काढली. या अंत्ययात्रेत हजारो ग्रामस्थ सहभागी झाले होते. या अंत्ययात्रेत खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या. ही अंत्ययात्रा सासवड रोड ते कचरा डेपो अशी ही अंत्ययात्रा काढण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 3, 2017 05:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...