आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर पुण्यातलं कचरा आंदोलन मागे

आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर पुण्यातलं कचरा आंदोलन मागे

तीन महिन्यात प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना नोकरीत कायम करणार, पालिकेचं आश्वासन

  • Share this:

09 जून : उरुळीदेवाची फुरसुंगी ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतलं आहे. तीन महिन्यात ग्रामस्थांच्या वारसांना नोकरीत कायम करण्याचं, तसंच प्रकल्पग्रस्तांना जमिनी देण्यासंदर्भात तांत्रिक अडचणी समजून घेऊन त्यानूसार मार्ग काढण्याचं लेखी आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतलं आहे. हे आंदोलन स्थगित केल्याचं गावकऱ्यांनी घोषीत केल

7 मे 2017 रोजी मुख्यमंत्र्यांनी काचराकोंडीवर एक महिन्यात कृती आराखडा करण्याचे आदेश दिले होते. त्याशिवाय 62 तरुणांना नोकरीत कायम करणं, कचराडेपोत गेलेल्या जमिनिबद्दल जमीन देणं, शहरातला कचरा शहरातच रिचवणं या प्रमुख मागण्या होत्या. उरळीदेवाची गावाचा कृती आराखडा दोन दिवसांपूर्वी देण्यात आला होता. पण या  ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण न झाल्यानं आजपासून पुन्हा आंदोलन सुरू झालं. मात्र आता पुणे मनपा आयुक्तांनी याबाबतचं लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी हे आंदोलन मागे घेतलं आहे.

काय आहेत ग्रामस्थांच्या मागण्या?

  • शहरातला कचरा शहरातच जिरवावा
  • कचराडेपो कायमस्वरूपी हटवावा
  • उरुळीदेवाची फुरसुंगी इथल्या 65 तरुणांना नोकऱ्यांमध्ये कायम करावं
  • कचराडेपोमध्ये साठलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून मोकळ्या होणाऱ्या जमिनी प्रकल्पग्रस्तांना द्याव्यात

First published: June 9, 2017, 12:29 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading