पिंपरी-चिंचवड, 21 जुलै : पिंपरी -चिंचवडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भल्या पहाटे मॉर्निग वॉकला निघालेला एक व्यक्ती मैदानातून जात असताना चिखलाच्या दलदलीत फसला. बाहेर पडण्यासाठी सर्व प्रयत्न करूनही बाहेर पडणं शक्य होत नव्हतं. जेवढी हालचाल वाढली तेवढा तो व्यक्ती आत फसत चालला होता. अखेर या व्यक्तीच्या मदतीला स्वच्छता कामगार धावले. स्वच्छता कामगारांच्या सतर्कतेमुळे या व्यक्तीला जीवदान मिळाले आहे. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. नेमकं काय घडलं? घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नीळकंठ पाटील हे भल्या पहाटे मॉर्निग वॉकला निघाले होते. मुख्य रस्त्यावर पोहोचण्यासाठी त्यांनी शॉर्टकट रस्त्याचा उपयोग केला. त्यांना मैदानातून मुख्य रस्त्यावर पोहोचायचे होते. मात्र मैदानातून जात असताना ते चिखलात फसले. त्यांनी बाहेर पडण्यासाठी धडपड सुरू केली, मात्र त्यांना बाहेर पडता येत नव्हते. ते अधिकच खोल चिखलात फसत चालले होते.
मॉर्निग वॉकसाठी घराच्या बाहेर पडलेला एक व्यक्ती चिखलात फसल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. pic.twitter.com/mmYrrfBsGL
— News18Lokmat (@News18lokmat) July 21, 2023
मदतीसाठी आरडाओरड मग त्यांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. ही बाब तिथे असलेले महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी विशाल सावळे यांच्या लक्षात आली. त्यांनी लगेच या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलानं नीळकंठ पाटील यांची या दलदलीतून सुखरूप सुटका केली. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

)







