News18 Lokmat

विघ्नसंतोषी लोकांचा डाव उधळला - डीएसके

'मला खोट्या गुन्ह्यांखाली अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय' असा आरोप डी एस कुलकर्णी यांनी पत्राद्वारे केला आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 4, 2018 10:27 AM IST

विघ्नसंतोषी लोकांचा डाव उधळला - डीएसके

04 जानेवारी : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना काल पुण्याच्या सेशन कोर्टानं 2 प्रकरणात जामीन मंजूर केल्यानंतर आज डीएसकेंनी एक नवा दावा केला आहे. 'मला खोट्या गुन्ह्यांखाली अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय' असा आरोप डी एस कुलकर्णी यांनी पत्राद्वारे केला आहे. 'विघ्नसंतोषी लोकांचा डाव उधळला' असंही त्यांनी या पत्रात लिहलं आहे.

फ्लॅट धारकांनी मोफा अंतर्गत याचिका दाखल केली होती म्हणून पुण्याच्या सेशन कोर्टाने डीएसकेंना दोन प्रकरणांत जामीन दिला होता.  डीएसकेंचं दुसरं प्रकरण म्हणजे कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी संदर्भात होतं. या प्रकरणातही त्यांना जामीन देण्यात आला. त्यामुळे मी दोषी नाही माझ्यावर प्रेम करणारी असंख्य जनता आहे असंही  डीएसके यांनी पत्रात म्हटलं आहे.

डीएसके यांचं पत्र...

माझ्याविरुद्ध कलम 420 व 406 लावणार्‍यांना आज न्यायालयाने चांगली चपराक दिली आहे. डीएसकेंनी फ्लॅट देण्यात उशीर केला व प्रॉव्हिडंड फंड वेळेत जमा केला नाही या कारणांचं निमित्त करून या मूठभर दुष्ट लोकांनी दावा लावला, तोही फसवणुकीचा ! कारण यांचा हेतू एकच - डीएसकेंना अटक व्हावी. पण सत्याचा वाली परमेश्वर. मी आजपर्यंत कुणाला फसवलेले नाही आणि पुढेही नाही. हे न्यायालयाच्याही लक्षात आले आणि माझ्याविरूध्द रचलेला हा कट कायद्याच्या परड्यात मात्र शिजला नाही. आज मा. कोर्टाने ही दोन्ही कलमे फेटाळत या विघ्नसंतोषी लोकांना सणसणीत चपराक देत मला जामीन मंजूर केला आहे. जगभरातून मला वाढता पाठिंबा मिळत आहे. माझ्यावर प्रेम करणारे चाहते 'डीएसके, हा आमचा खारीचा वाटा' म्हणत जमेल तशी रक्कम देत आहेत. याशिवाय फंड्सही उभे रहात आहेत. लवकरच डीएसके पुन्हा उभे राहिलेले दिसतील. आता फक्त थोडे दिवस...मग पाहा, चांगले दिवस पुन्हा आलेले दिसतील. आणि विघ्नसंतोषी लोकांनो, आता तरी या माकडचेष्टा थांबवा. तुमच्यामुळे माझा वेळ व पैसा विनाकारण वाया जातोय. शिवाय ठेवीदारांना पैसे व फ्लॅटधारकांना फ्लॅट देण्यातही तुमच्या या भाकड कारवायांमुळे उशीर होत आहे.

-डी. एस. कुलकर्णी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 4, 2018 10:27 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...