गॅस दाहिनीतून धूर आणि दुर्गंधीमुळे पुणेकर हैराण, बळावला फुफ्फुसाचा विकार

गॅस दाहिनीतून धूर आणि दुर्गंधीमुळे पुणेकर हैराण, बळावला फुफ्फुसाचा विकार

दररोजच्या त्रासाला कंटाळून राहिवाशांनी हरित लवाद तसेच मुंबई हायकोर्टात जनहीत याचिका दाखल केली

  • Share this:

अद्वैत मेहता,(प्रतिनिधी)

पुणे,4 डिसेंबर: पुण्यातील वडगावशेरी भागातील गॅस दाहिनीतून धूर आणि दुर्गंधी निघाल्यामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. दररोजच्या त्रासाला कंटाळून राहिवाशांनी हरित लवाद तसेच मुंबई हायकोर्टात जनहीत याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी पुणे महापालिकेने हात वर केले आहेत. स्मशानभूमी आधीपासून आहे. लोक नंतर या परिसरात राहायला आले आहेतय. इलाज नाही, असे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे.

नंदकिशोर चौक यांना आधीपासून फुफ्फुसाचा विकार होता. मात्र मागील दोन वर्षात तो इतका बळावला की, त्यांनी घरी ऑक्सिजनचा पुरवठा करणार मशीन आणावे लागले आहे. त्यांच्या सोसायटीच्या शेजारी असलेल्या स्मशानभूमीत गॅस दाहिनीत अंत्यसंस्कार केले जाते. त्यामुळे मोठ्याप्रमाणात धुराचे लोट बाहेर पडतातय त्यामुळे नंदकिशोर चौक यांचा विकार बळावला आहे. एकट्या नंदकिशोर चौक यांनाच नाही तर परिसरातील अनेक रहिवाशांनाही धूर आणि दुर्गंधीचा प्रचंड त्रास होत आहे.

संजय धोत्रे यांनी माहितीच्या अधिकारनुसार मिळवलेली माहिती अशी की, या गॅस दाहिनीत ससून रुग्णालयात असलेले बेवारस मृतदेह आणले जातात. या विरोधात त्यांनी हरित लवाद आणि मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. पुणे महापालिकेचे विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल यांनी नागरिकांना दुर्गंधी आणि धूराचा त्रास होत आहे हे मान्य केले आहे. मात्र गॅस दाहिनी आधीपासून या ठिकाणी आहे. सोसायट्या नंतर झाल्या. याकडे लक्ष वेधताना स्क्रबर, पाण्याचा फवारा वापरला जात आहे. धूर सोडणारी चिमणी 30 फुटांवर आहे, अशी माहिती महापालिकेच्या विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल यांनी दिली आहे.

पुणे शहरातील वैकुंठ स्मशानभूमी असो वा वडगावशेरी या उपनगरातील ही गॅस दाहिनी आजूबाजूच्या नागरिकांना धूर आणि दुर्गंधीमुळे शारीरिक त्रास तसेच मानसिक त्रासही होत आहे. मात्र, वाढत्या लोकसंख्येमुळे वेगाने होणारे नागरीकरण, प्रदूषणामुळे असे प्रश्न निर्माण होत आहेत. आता हरित लवाद आणि मुंबई हायकोर्ट याबाबत काय निर्णय देते, याकडे लक्ष लागले आहे.

First Published: Dec 4, 2019 04:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading