Home /News /pune /

नकोसा आकडा : पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनावरील लसीचे 4800 हून अधिक डोस गेले वाया

नकोसा आकडा : पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनावरील लसीचे 4800 हून अधिक डोस गेले वाया

दहा जण किंवा ठराविक नागरिक जमल्यानंतरच प्रशासनानं डोस द्यावा हे शक्य आहे का ते प्रशासनाला पाहावं लागेल.

पुणे, 20 एप्रिल : राज्यात सध्या लसीकरण करण्यावर मोठ्या प्रमाणावर भर दिला जात आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फेही आतापर्यंत 3 लाख नागरिकांना कोरोनाला आळा घालण्यासाठीची लस (corona vaccination) देण्यात आली आहे. पण यासोबतच लसीकरणाबाबतची पिंपरी-चिंचवड महापालिकेची (PCMC) एक नकोशी आकडेवारीही समोर आली आहे. कारण लसीकरणादरम्यान तब्बल 4,800 पेक्षा जास्त डोस (wastage of 4800 corona vaccine doses) वाया गेल्याचं समोर आलं आहे. (वाचा-‘मॅग्नेटो’ची मदत घेऊन मुंबई पोलीस करतायत मास्क वापरण्यासंबंधी जनजागृती) पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेचे प्रवक्ते शिरीष पोरेड्डी यांनी याबाबत माहिती दिली. त्यात ही कोरोना लसीचे डोस वाया गेल्याची बाब समोर आली आहे. पण लसीचे हे डोस वाया जाण्यासाठी केवळ आरोग्य कर्मचारीच जबाबदार आहेत असं नाही, तर त्यासाठी कुठंतरी नागरिकही जबाबदार असल्याचं पाहायला मिळालं आहे. लसींचे जे डोस वाया गेले ते तांत्रिक अडचणीमुळं वाया गेले आहेत. कोरोनाच्या लसीच्या 10 डोसची एक बाटली किंवा वायल उघडल्यानंतर 4 तासांच्या आत ते संपायला हवं. पण अशा वेळी सलग डोस घेण्यासाठी नागरिक आले नाही तर उरलेले डोस हे वाया जातात. त्यामुळं हे डोस वाया गेल्याचं पोरेड्डी यांनी सांगितलं आहे. (वाचा-पुण्यात खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा, प्राणवायूअभावी एकाचा मृत्यू) त्यामुळं यामध्ये नियोजनाबरोबरच नागरिकांचा प्रतिसादही महत्त्वाचा असल्याचं समोर येत आहे. दहा जण किंवा ठराविक नागरिक जमल्यानंतरच प्रशासनानं डोस द्यावा हे शक्य आहे का ते प्रशासनाला पाहावं लागेल. त्यासाठी नागरिकांना वाट पाहावी लागू शकते. तसंच नागरिकांनीही लस घेण्यासाठी स्वतःहून यायला हवं. म्हणजे डोस वाया जाण्याची वेळ येणार नाही. वाया गेलेल्या डोसमध्ये कोविशिल्डचे 3,100 तर कोवॅक्सिनचे 1,710 डोस वाया गेले आहेत. वायल उघडण्याआधीच 10 नागरिक उपस्थित आहेत का? याची शहानिशा कर्मचाऱ्यांनी करणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे. त्यामुळं प्रशानावरही या मुद्द्यावरून आरोप होत आहेत.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Pimpri chinchavad

पुढील बातम्या