पेशंटला उपचार नाकारले, पुण्यातल्या बड्या हॉस्पिटलवर पालिकेचा बडगा

पेशंटला उपचार नाकारले, पुण्यातल्या बड्या हॉस्पिटलवर पालिकेचा बडगा

वैद्यकीय पेशाला अनुसरून वर्तन नसल्याचा ठपका ठेवत पालिका आयुक्तांनी रुग्णालयाकडे 24 तासांत खुलासा मागितला आहे.

  • Share this:

पुणे 5 जून: कोरोना व्हायरसमुळे सगळ्याच हॉस्पिटवर प्रचंड ताण येत आहे. मात्र भीतीमुळे अनेक हॉस्पिटल्स रुग्णांवर उपचार करणे नाकारत आहेत. कोरोनाचे पेशंट्स वाढत असल्याने सरकारने खासगी दवाखाण्यातले 80 टक्के बेड्स राखून ठेवलं आहेत असा दावा केलाय. मात्र हॉस्पिटल्स मात्र आपल्याकडे बेड्स नाहीत असं सांगत आहेत. याच कारणांमुळे पूना हॉस्पिटलला पालिकेने कारणे दाखवा नोटीस दिली आहे.

हॉस्पिटलमध्ये ICU बेड्स शिल्लक नाहीत असं सांगत पूना हॉस्पिटलने दोन रुग्णांना रिक्षाने परत पाठवले. ते रुग्ण सध्या भारती हॉस्पिटलमध्ये भर्ती आहेत. नियमांनुसार हॉस्पिटलने त्यांच्यावर उपचार करायला पाहिजे होते किंवा माहिती घेऊन रुग्णवाहिकेने जिथं बेड्स उपलब्ध आहेत तिथे पाठवायला पाहिजे होते असं म्हटलं जातं.

वैद्यकीय पेशाला अनुसरून वर्तन नसल्याचा ठपका ठेवत पालिका आयुक्तांनी रुग्णालयाकडे 24 तासांत खुलासा मागितला आहे. अन्यथा कारवाई करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे.

हे वाचा - चीनने मिळवला भारताच्या 60 KM जमिनीवर ताबा? राहुल गांधींनी शेअर केला लेख

राज्यात कोरोना व्हायरसचा कहर कायम आहे. राज्यात शुक्रवारी कोरोनामुळे 139 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2436 नवे रुग्ण आढळून आले आहेत. राज्‍यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 80 हजारांच्यावर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे शुक्रवारी 1475 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हेही वाचा.....तर त्या शासकीय कर्मचाऱ्याचा पगार कपात करावा, उद्धव ठाकरे सरकारचा नवा आदेश

राज्यात रुग्ण बरे होण्याचा प्रमाण (Recovery Rate) 43.81 टक्के आहे. तर राज्यातील मृत्यू दर 3.55 टक्के आहे. आतापर्यंत 35156 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील कोरोना संक्रमितांचा आकडा 80 हजार 229 इतका झाला आहे. पैकी सध्या 42 हजार 215 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

 

 

First published: June 5, 2020, 9:03 PM IST

ताज्या बातम्या