जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / धक्कादायक! एसटी बसमध्ये कंडक्टरवर चाकूनं हल्ला; दौंडमध्ये खळबळ

धक्कादायक! एसटी बसमध्ये कंडक्टरवर चाकूनं हल्ला; दौंडमध्ये खळबळ

वाहकावर हल्ला

वाहकावर हल्ला

दौंडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

  • -MIN READ Pune,Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 23 जुलै, सुमित सोनवणे : दौंडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. प्रवाशाकडून कंडक्टरवर चाकूनं जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या घटनेत कंडक्टर जखमी झाला आहे. सातारा -पैठण एसटी बसमध्ये हा प्रकार घडला आहे. दत्ता संतराम कुटे असं या वाहकाचं नाव आहे. कुटे यांच्या तक्रारीवरून आरोपी प्रवाशी हरून इकबाल कुरेशी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, साताऱ्याहून बारामती मार्गे पैठणला निघालेल्या सातारा -पैठण एसटीच्या कंडक्टरवर एसटीतील प्रवाशाने चाकू हल्ला करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार दौंडमध्ये घडला. या प्रकरणी एसटी वाहक दत्ता संतराम कुटे यांनी दौंड पोलीस ठाण्यात संबंधित प्रवाशाविरोधात तक्रार दाखल केली. कुटे यांच्या तक्रारीवरून आरोपी हरून इकबाल कुरेशी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यस्थी करणाऱ्या प्रवाशांनाही दमदाटी   दरम्यान कुरेशी याने त्याच्याकडे असलेल्या चाकून वाहक दत्ता कुटे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या ओठाला जखम झाली. काही प्रवासी मध्यस्थी करण्यासाठी गेले असता त्यांना देखील आरोपीकडून दमदाटी आणि शिवीगाळ करण्यात आली. या प्रकारानंतर चालकाने बस थेट दौंड पोलीस स्टेशनला आणली, प्रवाशांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात