बारामती, 15 ऑगस्ट : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांच्यावरुन पवार कुटुंबात आणि पक्षात वातारवरण तापले आहे. आज या वादावर पडदा टाकण्यासाठी बारामतीत श्रीनिवास पवार यांनी स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे. पण, आता या कार्यक्रमात बदल झाला आहे.
आज बारामतीत श्रीनिवास पवार यांच्या घरी संपूर्ण पवार कुटुंबातील सदस्य हजर राहणार आहे. यावेळी पार्थ पवारही हजर राहतील अशी चर्चा रंगली होती. पण, एका मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, पार्थ पवार हे फक्त काका श्रीनिवास पवार आणि काकू शर्मिला पवार यांचीच भेट घेणार आहे.
मी तुला का सलाम करू रे..,स्वातंत्र्य दिनी शहिदाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, VIDEO
शु्क्रवारीच सुनेत्रा पवार यांची भेट झाली होती. त्यामुळे आज फक्त काकू शर्मिला पवार यांच्याकडे पार्थ हे जेवणासाठी येणार आहे. त्याच पार्थ यांची समजूत काढणार आहे. या वेळी अजित पवार हजर नसणार आहे. अजितदादा सध्या पुण्यात स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानिमित्ताने उपस्थितीत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून बारामतीत पवार कुटुंबीय एकत्र येणार अशी चर्चा रंगली होती. पण, आता अशी कोणतीही माहिती समोर येत नाही. पार्थ पवार हे फक्त आपल्या काका-काकूंकडे येणार आहे. त्याचे पार्थ यांची समजूत काढण्याची शक्यता आहे. त्यानंतर पार्थ पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, जाहिररित्या आजोबांनी कानउपटल्यामुळे पवार कुटुंबात दोन गट पडले आहे. राष्ट्रवादीत दोन गट पडले असून बहुंताश गट हा शरद पवारांच्या बाजूने आहे.
'पार्थ पवार माझे चांगले मित्र, ते चुकीचं पाऊल उचलणार नाहीत'
या दोन गटांपैकी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह राजेंद्र टोपे, छगन भुजबळ यांच्यासह इतर नेते पवारांच्या बाजूने उभे आहे. पार्थ यांनी वेगळी भूमिका कशी मांडली याबद्दल संपूर्ण माहितीही पवारांच्या कानी घालण्यात आली आहे.
खरंतर, विधानसभेच्या वेळीही श्रीनिवास पवार यांच्या मध्यस्थीनेच अजित पवार आणि शरद पवारांमध्ये समेट घडला होता. त्यामुळे यावेळीही पवार कुटुंबात पार्थवरून निर्माण झालेला तिढा श्रीनिवास पवारच सोडवणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान, पवार कुटुंबाच्या या एकूण वादात संपूर्ण कुटुंब हे पहिल्यांदाच एकत्र येणार आहे.