मुलाने विचारलं आई तू का हरली? पंकजा मुंडेंनी दिलं हे उत्तर

मुलाने विचारलं आई तू का हरली? पंकजा मुंडेंनी दिलं हे उत्तर

एवढं काम करूनही पराभव होते तेव्हा दु:ख होतं अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

  • Share this:

पुणे  08 मार्च : विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर स्वत:साठी आणि कुटुंबासाठी जास्त वेळ मिळत असल्याचं भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. अटीतटीच्या झालेल्या परळी विधानसभेच्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर महाराष्ट्रात पंकजा मुंडे यांच्या भूमिकेवर राजकारणात खळबळ उडाली होती. त्यांनी पक्षात बंडखोरीचा झेंडाही उभारला होता. मात्र दिल्लीतून हालचाली झाल्याने त्या सध्यातरी शांत झाल्या असल्याचं बोललं जातं. निवडणुकीतला हा पराभव त्यांच्या खूपच जिव्हारी लागलाय. एवढं काम करूनही पराभव होते तेव्हा दु:ख होतं अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपलं मन मोकळं केलं.

पंकजा मुंडे म्हणाल्या, आमदार मंत्री असताना अनेक कामे केली, मुलीचा जन्मदर वाढवला, अनेक जणांच्या बदली केल्या, पण आता मी का उभी आहे हे माहित नाही. तर एवढं करून पण मी इलेक्शन मध्ये जिंकू शकली नाही, माझ्या मुलाने विचारले तू का हरली? तर मी त्याला सांगितले की मी अभ्यास करते पण आमचा पेपर दुसरे कुणी तरी लिहतं त्यामुळे असं होतं.

सध्या सुरु असलेल्या  कोरोनाच्या प्रकोपावरही त्यांनी भाष्य केलं. त्या म्हणाल्या, या व्हायरसमुळे अनेक कार्यक्रम रद्द होत आहेत, या जगात आता फक्त शोलेतला ठाकूर सेफ राहू शकतो. कारण तुम्हाला सर्वांना माहीत आहे की, का तर तो शेकहॅन्ड करू शकत नाही असं त्या म्हणाल्या.

हे वाचा...

धडाकेबाज सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धावा जायभाये यांच्यावर गोळीबार

नागपूरमध्ये भररस्त्यावर तरुणावर अंदाधुंद गोळीबार

भिवंडी हादरली, बारा तासात दोन जणांची हत्या

 

 

 

First published: March 8, 2020, 11:41 AM IST

ताज्या बातम्या