ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं.नारायणराव बोडस यांचं निधन

थेट विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या गायकीशी नाते सांगणाऱ्या बोडस घराण्यात नारायणरावांचा जन्म झाला. त्यांचे संगीताचे शिक्षण वडील लक्ष्मणराव तसेच प्रल्हादपंत गानू यांच्याकडे झाले. नोकरी आणि शास्त्रीय गायनाचा रियाज अशी कसरत करीत त्यांनी संगीत साधना केली.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Nov 27, 2017 01:43 PM IST

ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं.नारायणराव बोडस यांचं निधन

पुणे, 27 नोव्हेंबर : ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं.नारायणराव बोडस यांचे आज पुण्यात निधन झाले. थेट विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या गायकीशी नाते सांगणाऱ्या बोडस घराण्यात नारायणरावांचा जन्म झाला. त्यांचे संगीताचे शिक्षण वडील लक्ष्मणराव तसेच प्रल्हादपंत गानू यांच्याकडे झाले. नोकरी आणि शास्त्रीय गायनाचा रियाज अशी कसरत करीत त्यांनी संगीत साधना केली.

गायक नट म्हणून त्यांच्या कारकीदीर्ची सुरुवात 'सौभाग्यरमा' या डॉ. बी. एन. पुरंदरे लिखित नाटकापासून झाली. दाजी भाटवडेकर यांना या नाटकातील नारायणरावांचे व्यक्तिमत्त्व आवडले. संस्कृत भाषेत नाटके करणाऱ्या दाजींना आपल्या संस्कृत नाटकासाठी असाच बोलक्या चेहऱ्याचा, भारदस्त आवाजाचा व चांगला गायक असणारा नट हवा होता. त्यांनी लगेच 'सं. शारदम्' या नाटकासाठी त्यांची निवड केली. त्यानंतर दाजी भाटवडेकरांच्या अनेक नाटकात त्यांनी भूमिका केल्या. त्यानंतर त्यांनी सं. सौभद्रम्, पती गेले ग काठेवाडी, बुद्ध तिथे हरला, सं. मृच्छकटिक, सं. महाश्वेता, सं. मानापमान, सं. स्वयंवर, सं. सौभद्र, सं. संशयकल्लोळ, सं. धाडिला राम तिने का वनी?, सुंदर मी होणार, मंदारमाला, सुवर्णतुला, बावनखणी, संत गोरा कुंभार, लहानपण देगा देवा, देव दीनाघरी धावला, तो एक राजहंस, सं. कृष्णार्जुनयुद्ध, अशा अनेक संगीत व बिगर संगीत नाटकात अविस्मरणीय व गाजलेल्या भूमिका केल्या.

त्यांनी काही चित्रपट व टीव्ही मालिकांतूनही काम केले, पण त्यांना संगीत रंगभूमीच अधिक भावली. रंगभूमीवर वावरण्याचे व्यसन काही औरच असते व ते भलेभले सोडू शकत नाहीत. पण नारायणरावांनी वयाची साठी पूर्ण झाल्यावर रंगभूमीची कायमची रजा घेण्याचा निर्णय घेतला आणि १९९३ मध्ये गोव्यात संगीत सौभद्रमध्ये अखेरची भूमिका करून रंगभूमीचा निरोप घेतला. त्यानंतर त्यांनी संगीत अध्यापनाचे काम सुरू केले. १२ वर्ष त्यांनी मुंबई विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना संगीत शिकवले. तेथून निवृत्त झाल्यावर २००६ सालापासून ते वाशी येथील गांधर्व महाविद्यालयात संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विनामूल्य मार्गदर्शन करीत आहेत. त्यांच्या या प्रदीर्घ संगीतसेवेचा शासनाने बालगंधर्व पुरस्कार देऊन गौरव केला होता.

पं.नारायणराव बोडस यांचे चिरंजीव केदार बोडस त्यांचा वारसा पुढे नेत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 27, 2017 01:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...