पालखी सोहळ्यात घुसला JCB, नामदेव महाराजांचे 17 वे वंशज जागीच ठार

पालखी सोहळ्यात घुसला JCB, नामदेव महाराजांचे 17 वे वंशज जागीच ठार

कार्तिकी वारीसाठी पंढरपुरहून आळंदीकडे निघालेल्या पालखी सोहळ्यात जेसिबी (JCB) मशीन घुसल्याने मोठा अपघात झाला.

  • Share this:

पुणे,19 नोव्हेंबर:कार्तिकी वारीसाठी पंढरपुरहून आळंदीकडे निघालेल्या पालखी सोहळ्यात जेसिबी (JCB) मशीन घुसल्याने मोठा अपघात झाला आहे. जेसिबीचा ब्रेक फेल झाल्याने ते दिंडीत घुसले. दोन वारकरी चिरडून जागीच ठार झाले. मृतांमध्ये नामदेव महाराजांचे वंशजांचा समावेश आहे. तसेच या अपघातात 15 जण जखमी झाले आहेत. पुणे-सासवड मार्गावरील दिवे घाटात तिसऱ्या वळणावर मंगळवारी सकाळी हा अपघात झाला. जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती रामभाऊ चोपदार यांनी दिली आहे. या घटनेमुळे वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे.

मिळालेली माहिती अशी की, पंढरपूरवरून आळंदीला दिंडी निघाली होती. दिवे घाटात तिसऱ्या वळणावर एक जेसीबी आला. त्याचा ब्रेक फेल झाल्याने ते थेट दिंडीत घुसले. आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमाला निघाले होते. दिंडीत एकूण 2 ते 3 हजार वारकरी पायी चालले होते. नामदेव महाराजांचे 17 वे वंशज सोपान महाराज तुळशीदास नामदास (वय-36, रा. पंढरपर), अतुल महाराज आळशी (वय-24, रा.खेड) या दोघांचा जागेवर मृत्यू झाला. विष्णू सोपान हळवाल, शुभम नंदकिशोर आवरे, दीपक अशोक लासुरे, गजानन संतोष मानकर, वैभव लक्ष्मण बराटे, अभय अमृत मोकम्फळे, किर्तीमन प्रकाश गिरजे, आकाश माणिकराव भाटे, ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ कदम, गरोबा जागडे, विनोद लहासे, नामदेव सागर, सोपान महासाळकर, गजानन सुरेश मानकर, सोपान मासळीकर अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर हडपसर येथील नोबेल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. लोणी काळभोर पोलिसांकडून तपास सुरू केला आहे.

दरम्यान, दरवर्षी आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणारा आषाढी वारी सोहळा आपल्याला माहीत आहे. त्याचप्रमाणे कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरहून आळंदीला पांडुरंगाची वारी निघते. ही वारी पुणे शहरापासून जवळ असलेल्या दिवे घाटात पालखी सोहळ्यात जेसिबी घुसला. यात नामदेव महाराजांचे वंशज सोपान तुळसीदास नामदास यांच्यासह दोघांचा जागीच मृत्यू झाला.

मजल दरमजल करत हा सोहळा 20 तारखेला अष्ठमीला आळंदीत दाखल होईल. कार्तिकी त्रयोदशीला माऊलींनी संजीवन समाधी घेतली होती. त्याही वेळेस साक्षात पांडुरंग उपस्थित होते, अशी आख्यायिका आहे. माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याचे यंदाचे 724 वर्षे आहे. या कार्तिकी वारीला पंढरपूरहुन आळंदीत येणाऱ्या पांडुरंगाच्या ह्या पालखी सोहळ्याचे हे 11 वे वर्षे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 19, 2019 10:24 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading