Home /News /pune /

भेटी लागी जीवा! संत मुक्ताई पालखीचं मुक्ताईनगरहून पंढरपूरकडे प्रस्थान, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या महापूजा

भेटी लागी जीवा! संत मुक्ताई पालखीचं मुक्ताईनगरहून पंढरपूरकडे प्रस्थान, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या महापूजा

Ashadhi Wari 2021: आज आषाढ शुद्ध दशमीला आषाढी वारी पालखी सोहळ्यातील माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पादुका विशेष शिवशाही एसटी बसेस अनुक्रमे देहू आणि आळंदी वरून पंढरीकडे मार्गस्थ होतील.

    देहू, 19 जुलै: आज आषाढ शुद्ध दशमीला आषाढी वारी (Ashadhi Wari 2021) पालखी सोहळ्यातील माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पादुका विशेष शिवशाही एसटी बसेस अनुक्रमे देहू आणि आळंदी वरून पंढरीकडे (pandharpur) मार्गस्थ होतील. माऊलींच्या चांदीच्या चल पादुकांसोबत 2 शिवशाही बसेसने 40 वारकरी असतील यात मानाच्या दिंडीवाल्यांमध्ये रथापुढील पहिल्या 9 आणि रथामागील पहिल्या 9 दिंडीतील वारकरी ,पुजारी ,चोपदार आणि मानकऱ्यांचा समावेश असेल. पादुकांसोबत स्वतंत्र पोलीस बंदोबस्त असेल. माऊलींच्या पादुकांवर पहाटे पवमान पूजा अभिषेक झाल्यावरनंतर ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या तर्फे नैवेद्य दाखवला जाईल. कीर्तन झाल्यावर आजोळघरातील पादुका पालखी सोहळा मालक राजाभाऊ आरफळकर यांच्या हातात दिल्या जातील आणि सकाळी 8.30 च्या सुमारास पादुका मार्गस्थ होतील. देहूतूनही जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुका देऊळ वाड्यातील भजनी मंडपातून 40 वारकऱ्यांसह 2 शिवशाही बसेसने मार्गस्थ होतील. 40 वारकऱ्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. देहूत 18 दिवस विविध कार्यक्रम राबवण्यात आले. सकाळी 8 च्या सुमारास वाखरीकडे पादुका प्रस्थान ठेवतील. मोठी बातमी: लवकरच अमित ठाकरेंच्या खांद्यावर मोठी जबाबदारी? वाखरीमध्ये संतभेट झाल्यावर पंढरीकडे अडीच किलोमीटर पायी वारीने पादुका निवडक वारकऱ्यांच्या सहभागात नेल्या जातील. मंगळवारी म्हणजे उद्या पहाटे 2 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा होईल. महापूजेवेळी मुख्यमंत्र्यांसह 50 लोकांनाच परवानगी असेल मंदिरातील विणेकरी दाम्पत्य यंदाचे मानाचे वारकरी असून मानाचे वारकरी हे विदर्भातल्या वर्धा जिल्ह्यातील आहेत. विणेकरी केशव कोलते आणि इंदुबाई मानाचे वारकरी या दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसोबत यंदाच्या महापूजेचा मान मिळणार आहे. जळगाव जिल्ह्यातील संत मुक्ताई संस्थानच्या संत मुक्ताई पालखीचा पहिला मान असतो. जळगावातून मुक्ताईंच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालं असून मुक्ताईंच्या पादुका शिवशाही बसनं पंढरपूरकडे रवाना झाल्यात. हरिनामाच्या जयघोषानं मुक्ताईनगर दुमदुमलं. सर्वात जास्त प्रवास करून जाणारा पालखी सोहळा आहे. मुक्ताईंच्या पादुकांसोबत 2 बसमध्ये 40 वारकरी आहेत. दुपारी वाखरीत मुक्ताई आणि ज्ञानेश्वर सोपान यांची बंधू भेट होईल.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Pandharpur, Pune

    पुढील बातम्या