Home /News /pune /

पिंपरीतील जम्बो कोविड सेंटरचा हलगर्जीपणा; अनेक टन Oxygen गेलं वाया

पिंपरीतील जम्बो कोविड सेंटरचा हलगर्जीपणा; अनेक टन Oxygen गेलं वाया

पिंपरी चिंचवडमधील जम्बो कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरुच राहिल्यामुळे अनेक टन ऑक्सिजन वाया गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पिंपरी, 27 एप्रिल: महाराष्ट्रात कोरोना (Corona) बाधितांची संख्या वाढत असतानाच अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा (Oxygen shortage) जाणवत असल्याचं पहायला मिळत आहे. ऑक्सिजनच्या अभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याच्याही घटना समोर येत आहेत. त्याच दरम्यान आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) जम्बो कोविड रुग्णालयात ऑक्सिजनचा अपव्यय (Oxygen wastage) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पिंपरी चिंचवडमधील अण्णासाहेब मगर स्टेडियम जम्बो कोविड सेंटरमध्ये कोरोना बाधितांवर उपचार करण्यात येतात. याच जम्बो कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन वाया गेल्याचा प्रकार समोर आला आहे. या कोविड सेंटरमधील एका वार्डात एकही रुग्ण नसतांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरूच ठेवण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. सध्या पुणे जिल्ह्यात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून नेमण्यात आलेल्या एका पथकाद्वारे रुग्णालयातील ऑक्सिजनच ऑडिट केलं जातंय. या पथकाने भेट देऊन जम्बो कोविड सेंटरची पाहिणी केली त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला आहे. वाचा: डॉक्टर असलेल्या मुंबईच्या माजी महापौरांनी सांगतल्या कोरोनाविषयी Tips दरम्यान मोकळ्या वार्डात ऑक्सिजन सुरूच ठेवल्याने काही टन ऑक्सिजन वाया गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जम्बो कोविड सेंटर चालकाकडून या बेफकिरी संदर्भात लेखी खुलासा मागविण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी आणि नोडल अधिकारी बाळासाहेब खांडेकर यांनी दिली आहे. सध्याच्या परिस्थितीत केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशातील इतर राज्यांतही ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजनच्या तुडवड्यामुळे कोविड बाधित रुग्णांचे प्राण जात आहेत. ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी इतर राज्यांतून टँकर्स आणि रेल्वेद्वारे ऑक्सिजन आणण्यात येत आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Coronavirus, Oxygen supply, Pimpri chinchavad

पुढील बातम्या