मराठी बातम्या /बातम्या /पुणे /ऑक्सिजन, लस, रेमडेसिवीर केंद्राने द्यावे, मग तुम्ही काय झोपा काढताय? चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला सवाल

ऑक्सिजन, लस, रेमडेसिवीर केंद्राने द्यावे, मग तुम्ही काय झोपा काढताय? चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला सवाल

राज्यात सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटात वैद्यकीय सुविधा कमी पडत असल्याचं पहायला मिळत आहे.

राज्यात सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटात वैद्यकीय सुविधा कमी पडत असल्याचं पहायला मिळत आहे.

राज्यात सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटात वैद्यकीय सुविधा कमी पडत असल्याचं पहायला मिळत आहे.

पुणे, 1 मे: महाराष्ट्रात कोरोनाच्या (Corona) वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णांना बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत आहे. त्यासोबतच कोरोना प्रतिबंधात्मक लसींचाही तुटवडा (Vaccine shortage) जाणवत आहे. अशा परिस्थितीत सुद्धा राजकारण काही थांबताना दिसत नाहीये. सत्ताधारी केंद्र सरकार (Central Government)वर दुजाभावाचा आरोप करत आहेत तर भाजप नेतेही राज्य सरकारवर (Maharashtra Government) टीका करताना दिसत आहेत.

तुम्ही काय चपात्या भाजत होते का?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटलं, "प्रत्येक विषयात जर केंद्र करणार असेल, लसीच्या बाबतीत जर आपण केंद्रावर अवलंबून असू पण केंद्राने आता तुम्हाला मोकळीक दिली आहे तुम्ही महाराष्ट्रात निर्मिती करु शकतात, इतर राज्यांतून, देशातून आणू शकतात. तशाच प्रकारे ऑक्सिजनचं आहे. ऑक्सिजन प्लान्ट सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणी रोखलं होतं का? ज्योतिषी जस म्हणतो की मी आधी म्हटलो होतो तसं आता तुम्ही म्हणताय की मी सहा महिन्यांपूर्वी म्हटलं होतं. मग काय केलं तुम्ही? चपात्या भाजल्या का? ऑक्सिजन प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना बोलावून ऑक्सिजनची क्षमता वाढवण्यासाठी सांगितलं का नाही? "

रेमडेसिवीरचं ही तसंच आहे. तुमच्या राज्यात ज्या कंपन्या आहेत त्यांच्यासोबत तुम्ही बैठक घेतली का? प्रोडक्शन वाढवण्यास सांगितलं का नाही? आम्ही ऑक्सिजन निर्मिती करणार नाही, आम्ही रेमडेसिवीर करणार नाही, आम्ही पीपीई किट निर्मिती करणार नाही, आम्ही लस निर्मिती आणि आणण्यासाठी धडपड करणार नाही सरळ केंद्राकडे बघायचं असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.

तुम्ही काय झोपा कायढताय का?

चंद्रकांत पाटील म्हणाले, तुमच्या राज्यात रेमडेसिवीर निर्मिती करण्याच्या कंपन्या तुम्ही त्यांना सहकार्य करुन क्षमता वाढवू शकतात. ऑक्सिजन तर 100 टक्के निर्मिती करु शकतात. पुणे मनपाकडून सोमवारपासून ऑक्सिजन निर्मिती सुरू होणार आहे. महिन्याभरात जेवढे रुग्णालय आहेत त्यांना इतरांकडून ऑक्सिजन घेण्याची गरज पडणार नाही. जर पुणे महानगरपालिका करु शकते तर सरकार काय जोपा काढत होत का?

...तर लशीचा तुटवडा निर्माण झाला नसता, अजित पवारांचा मोदी सरकारवर निशाणा

अजितदादांना आंतरराष्ट्रीय राजकारण जास्त कळतं

चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं, जगातील वेगवेगळे देश आपल्याला मदत करत आहेत. तुम्ही जर म्हणाल की आमच्या देशातलं आम्ही बाहेर देणार नाही. जगात ज्यावेळी तुम्हाला प्रमुख देश म्हणून काम करायचं असतं त्यावेळी अडचणीच्या काळात एकमेकांना मदत करायची असते. मी इतकच सांगेल की अजितदादां एवढं ज्ञान मला नाहीये.

काय म्हणाले होते अजित पवार?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं होतं की, आपल्या देशात मोठ्या प्रमाणात लसींचे उत्पादन करण्यात आले ते इतर देशात पाठवायची गरज नव्हती. त्या लस जर आता असत्या तर खूप लसीकरण झालं असतं, किमान ज्या लस दिल्या आहेत त्या तरी परत आणाव्यात.

First published:
top videos

    Tags: BJP, Chandrakant patil, Coronavirus