पुणे, 20 एप्रिल : पुण्यात कोरोनाची अत्यंत गंभीर स्थिती (Coronavirus in Pune) निर्माण झाल्याचं समोर आलं आहे. कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाच उपचारासाठी लागणारा ऑक्सिजनचा मात्र मोठा तुटवडा पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करत असलेल्या योग हॉस्पिटल प्रशासनानं ऑक्सिजनअभावी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे. दोन दिवसांपासून ऑक्सिजनचा तुटवडा असल्याचं रुग्णालयानं म्हटलं आहे.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता अनेक खासगी रुग्णालयांतही कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहे. पुण्यातील योग हॉस्पिटलमध्येही कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याठिकाणी 14 आयसीयू आणि 23 ऑक्सिजन बेड आहेत. पण त्यासाठी लागणारा ऑक्सिजनच उपलब्ध नसल्यानं आता कोरोना रुग्णांचे हाल होतायत. सध्या याठिकाणी 11 रुग्ण हे व्हेंटिलेरवर आहेत आणि आमच्याकडं अवघा 1 तासाचा ऑक्सिडनचा साठा असल्यां रुग्णालयाचं म्हणणं आहे. गेल्या दोन दिवसांपासून ऑक्सिजनचा तुटवडा असून एका रुग्णाचा ऑक्सिजन न मिळाल्यानं मृत्यू झाल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
Yog Multispeciality Hospital in Pune runs out of oxygen supply.
One patient has died due to lack of oxygen supply. For last 2 days, we're struggling due to lack of liquid oxygen. Currently, 11 patients are on ventilators. We've only an hour's supply left: Dr Abhijeet Darak pic.twitter.com/AP4hZOuFnr
— ANI (@ANI) April 20, 2021
(हे वाचा -Network ची शोधाशोध, लसीकरणाच्या ऑनलाईन प्रक्रियेसाठी कर्मचारी छतावर)
हॉस्पिटलमधील डॉक्टर अभिजीत दरक यांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना ऑक्सिजनचे 20 सिलिंडर पुरवण्याचं आश्वासन दिलं होतं. पण ते कधी पोहोचतील याची माहिती नसल्याचं डॉक्टर दरक म्हणाले आहेत. विशेषम म्हणजे ते सिलिंडर मिळाले तरी तो साठा 3 ते 4 तासच पुरू शकेल असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळं पुण्यात खासगी रुग्णालयांत रुग्णांसाठी ऑक्सिजन पुरवठ्याकडं लक्ष देणं गरजेचं असल्याचं स्पष्ट झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.