पुणे, 09 मार्च : 'आमचं राजकारण नकलांवर उभं नाही ते कामावर आणि संघर्षावर उभं आहे' असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
पुण्यात मनसेचा वर्धापन दिन सोहळा साजरा झाला. यावेळी राज ठाकरे यांनी जोरदार भाषण केलं. यावेळी नेहमीच्या स्टाईलमध्ये नक्कल करत संजय राऊत यांची खिल्ली उडवली होती. आता संजय राऊत यांनीही लगेच प्रत्युउत्तर दिले आहे.
आमचे राजकारण नक्कलावर उभे नाही. आमचे राजकारण संघर्षावर उभे आहे. आमचे राजकारण हे स्वाभिमानावर उभे आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना जशास तसे उत्तर दिले.
'मुख्यमंत्री आजारी असल्यामुळे निवडणुका पुढे ढकल्या आहेत, असं राज ठाकरे म्हणाले आहे, पण काही लोकं आजारी नसताना ही सक्रिय नसतात. मुख्यमंत्री इतकं सक्रिय कोणीच नाही म्हणून तर राज्य पुढे चाललंय, असंही राऊत म्हणाले.
'आम्हाला ईडीने बोलावले, आम्ही आलो. पण आता सगळ्यांनी बोलावी अशी परिस्थिती आहे. आम्ही बोलत राहू, आम्ही कुणाचे मिंधे नाहीत. ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. प्रखर हिंदुत्वाची शिवसेना आहे. शिवसैनिक बोलणारच आहे. त्यामुळे शिवसेना नेहमी सत्य बोलत राहणार आहे. कर नाही त्याला डर कशाची, असंही राऊत म्हणाले.
पाच राज्यांत निवडणुकांचे निकाल आहेत. त्याकडे आपण उद्या सकाळी पाहू. आतापर्यंत जे काही एक्झिट पोल आले आहेत, त्याकडे लक्ष देऊ नका. नक्कीच प्रमुख राज्यामध्ये परिवर्तन होणार आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
'ते संजय राऊत, तो क्या हुआ, एक बात ऐसी है. ये करते है' असं म्हणत राज ठाकरे यांनी संजय राऊत यांची नक्कल काढली. टीव्ही सुरू झाला की, हे सुरू झाले. कॅमेरा बंद झाला की, हे लगेच नीट झाले' असा सणसणीत टोला राज यांनी राऊतांना लगावला.
काय प्रकारचे आरोप करत आहे. टीव्हीवर काय बोलतात, शिव्या काय देताय. राजकारणामध्ये येणाऱ्या पिढ्या काय करणार आहे काय पाहत असतील. राज्याच्या राजकारणात हे सुरू आहे. मग जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीला काय होईल. आपल्या तोंडाला येईल ते बोलत आहे. पुढे भविष्यात काय होईल, असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थितीत केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.