पुणे, 04 जून: पुण्यात (Pune) एका 40 वर्षीय व्यक्तीला स्पीड पोस्टद्वारे पत्र (Sent Speed post) पाठवत 20 लाख रुपयांची खंडणी (Demand 20 lakh ransom) मागितल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑनलाइन पद्धतीने 20 लाख रुपये जमा न केल्यास तुला आणि तुझ्या कुटुंबीयाला जिवंत सोडणार (Threat to death) नाही, अशी धमकी अज्ञात आरोपीने दिली आहे. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी एका बँक मॅनेजर विरोधात दिलेली तक्रार मागे घ्यावी, अशी मागणीही या पत्रात केली आहे. याप्रकरणी संबंधित व्यक्तीने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास मार्केट यार्ड पोलीस करत आहेत.
खरंतर, संबंधित फिर्यादीने काही दिवसांपूर्वी एका बँक मॅनेजर विरोधात स्वारगेट पोलिसांत तक्रार दाखल केली होती. चौकशीअंती काहीही तथ्य न आढळल्याने केवळ अर्ज फाइल करण्यात आला होता. त्यामुळे संबंधित बँक मॅनेजर विरोधात दिलेली तक्रार मागे घे. त्याचबरोबर 20 लाख रुपये ऑनलाइन पद्धतीने माझ्या खात्यात जमा कर, अन्यथा तुला आणि तुझ्या कटुंबीयांना जीवंत सोडणार नाही, अशी धमकी अज्ञात व्यक्तीने फिर्यादीकडे केली होती.
लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात राहणाऱ्या 42 वर्षीय फिर्यादीला 13 मे रोजी हे निनावी पत्र आलं होतं. आरोपीने पत्र पाठवण्यासाठी स्पीड पोस्टाचा वापर केला होता. धमकीचं पत्र आल्यानंतर फिर्यादीने त्वरित न्यायालयात धाव घेऊन खाजगी तक्रार दाखल केला. यानंतर न्यायालयाने फिर्यादीची दखल घेत मार्केट यार्ड पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. संबंधित पत्र नेमकं कोणी पाठवलं, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. परंतु संबंधित बँक मॅनेजरवर पोलिसांना संशय आहे.
हे ही वाचा-Pune : सोबत दारु प्यायल्यानंतर मित्राचीच हत्या, फावड्याच्या दांड्याने घेतला जीव
याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नसून स्पीड पोस्ट पाठवणाऱ्या पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. त्याचबरोबर संबंधित खंडणीची रक्कम ज्या बँक खात्यात जमा करण्यास सांगितलं होतं. हे खातं नेमकं कोणाचं आहे, याचा तपासही पोलिसांकडून केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Pune