Home /News /pune /

मनाची श्रीमंती मोठी! अपघातात मृत पावलेल्या कर्त्या पुरुषाचे कुटुंबीयांनी अवयव केले दान

मनाची श्रीमंती मोठी! अपघातात मृत पावलेल्या कर्त्या पुरुषाचे कुटुंबीयांनी अवयव केले दान

दु:खाचा डोंगर कोसळून देखील मनाची श्रीमंती दाखवून अपघातात मृत पावलेल्या कर्त्या पुरुषाचे अवयव दान करण्याचा कुटुंबीयांनी निर्णय घेतला.

जुन्नर, 23 डिसेंबर: पैशाचं, अन्नाचं, कपड्यांचं दान सगळ्यांना माहीत आहे. मात्र, अवयवांचं दान होऊ शकतं आणि त्यामुळे दुसऱ्यांचे प्राण वाचू शकतात. याची जाणीव अजुनही समाजात रूजलेली नाही. पण अवयव दानाचं महत्त्व जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथील एका गरीब कुटुंबाला चांगलंच पटलं आहे. दु:खाचा डोंगर कोसळून देखील मनाची श्रीमंती दाखवून अपघातात मृत पावलेल्या कर्त्या पुरुषाचे अवयव दान करण्याचा कुटुंबीयांनी निर्णय घेतला. हेही वाचा..महाबळेश्वरमध्ये भीषण अपघात! औरंगाबादच्या पर्यटकांची कार कोसळली नदीपात्रात बेल्हे येथील एका बांधकाम व्यावसायिकाकडे काम करणारे संतोष धोंडीभाऊ बांगर (वय-43) यांचा लाकडी परातीच्या फळीवरुन पाय घसरला व मेंदूला मार लागल्यानं उपचारादरम्यान दोन दिवसानंतर मृत्यू झाला. या घटनेनंतर वृद्ध आई, पत्नी व लहान भावानं डोळे, फुफूस, ह्दय, यकृत, किडनी या अयवदानाला संमती देऊन मनाची श्रीमंती दाखविली आहे. संतोष बांगर यांच्या या अवयवांतून एखाद्या रुग्णाचं प्राण वाचतील, ही प्रामाणिक भावना बांगर कुटुंबीयांची आहे. ग्रामपंचायत सदस्य बबन औटी यांनी दिलेली माहिती अशी की, बेल्हे येथील संतोष धोंडीभाऊ बांगर हे एका स्थानिक बांधकाम व्यावसायिकाकडे कामाला होते. काम करत असताना लागडी फळीवरुन त्यांचा पाय सरकला आणि ते खाली कोसळले. त्यांच्या मेंदूला मार लागल्यानं ते बेशुद्ध झासे. तशाच अवस्थेत त्यांना पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, दोनच दिवसांत उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. एका गरीब मजुराच कुटूंब उघड्यावर पडलं. संतोष यांनी वडील नाहीत. वृद्ध आई, पत्नी व एक 7 व्या इयत्तेत शिकत असलेला मुलगा असं कुटूंब उघड्यावर पडलं आहे. फक्त 11 गुंठे जमीन आहे. सगळं काही मजुरीवरच सुरू आहे. त्यात कमावता पुरूष गेल्यानं बांगर कुटुंबावर दुः खाचा डोंगर कोसळला आहे. या परिस्थितीत स्वतः चं डोंगराएवढं दुः ख बाजुला ठेऊन बांगर कुटुंबानं अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्यांचे प्राण वाचू शकतात याची जाणीव अजुनही समाजात रूजलेली नाही. मात्र, या अशिक्षित मजुराच्या अशिक्षित कुटुंबीयांनी दाखवलेल्या औदार्यामुळं डॉक्टरांना चार जणांचे प्राण वाचवण्यात यश मिळालं. कुटूंबानं समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. हेही वाचा...मुंबईच्या मॉडेल रेप केसमुळे मुख्यमंत्र्यांची खुर्ची अडचणीत; भाजपचा हल्लाबोल पत्नीनं दाखवलं धैर्य... विशेष म्हणजे मृताच्या पत्नीनं धैर्य दाखवत पतीच्या अवयवदानाचा निर्णय घेऊन समाजापुढं नवा आदर्श निर्माण केला. आता त्याच्या कुटुंबाच्या मदतीसाठी समाजाने पुढं यावं, असं आवाहन जानकू डावखर, बबन औटी, विकास बढे यांनी केलं आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या