मराठी बातम्या /बातम्या /पुणे /विषय वाढवायचा नाही पण...; अजितदादांनी पुन्हा भाजपला फटकारलं

विषय वाढवायचा नाही पण...; अजितदादांनी पुन्हा भाजपला फटकारलं

आज पुण्यात विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी बोलताना अजित पवार यांनी भाजपाला खोचक टोला लगावला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune (Poona) [Poona], India

पुणे, 6 जानेवारी :  आज पुण्यात विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी बोलताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.  'छत्रपती संभाजी महाराज हे धर्मरक्षक नव्हते तर ते स्वराज्य रक्षक होते' असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. त्यावरून भाजपाने आक्रमक भूमिका घेत आंदोलन केलं. या वादावर प्रतिक्रिया देताना आज अजित पवार यांनी भाजपाला चांगलचं सुनावलं आहे.

नेमकं काय म्हटलं अजित पवार यांनी? 

पुन्हा हा विषय वाढवायचा नाही, मात्र मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. प्रत्येकाला भूमिका मांडण्याचा अधिकार असतो. मी कुठेही अपशद्ब वापरलेले नाहीत. मात्र राज्यपालांविरोधात कोणी का बोलत नाही असा सवाल उपस्थित करत त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. पुढे बोलताना अजित पवार यांनी म्हटलं की, हा विषय वाढवण्यात अर्थ नाही. आम्हाला जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. पुरोगामी विचार मानणारा आमचा पक्ष आहे. कारण नसताना हा वाद पेटवला जात आहे.  प्रत्येकाला भूमिका मांडण्याचं स्वातंत्र आहे, मात्र आपली भूमिका मांडत असताना कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी असं पवार यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : Sanjay Raut : संजय राऊतांच्या जामिनाबाबत मोठी अपडेट; जामीन रद्द होणार?

निलेश राणेंची टीका 

दरम्यान दुसरीकडे आता या वादात भाजप नेते निलेश राणे यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांनी अजित पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. अजित पवार यांची बोलण्याची लायकी नाही, इतिहास माहिती नसेल तर बोलू नका. उदयनराजेंना कोणी पाडलं? असा घणाघात निलेश राणे यांनी अजित पवारांवर केला आहे.

First published:

Tags: Ajit pawar, BJP, Devendra Fadnavis, NCP, Nitesh rane, Sharad Pawar