Home /News /pune /

"राज्यातले विरोधक हे एक प्रकारचं ब्लॅक फंगसच, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा" - संजय राऊत

"राज्यातले विरोधक हे एक प्रकारचं ब्लॅक फंगसच, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा" - संजय राऊत

Sanjay Raut on BJP: शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर आपल्या खास शैलीत टीका केली आहे.

पुणे, 22 मे: राज्यात कोरोनाचा (Coronavirus0) प्रादुर्भाव कमी होत असताना म्युकरमायकोसिस (mucormycosis) अर्थात ब्लॅक फंगसचा (Black fungus) धोका वाढत आहे. या संकट काळातही राजकीय नेत्यांत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. आता शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला (BJP) थेट ब्लॅक फंगस म्हणून संबोधत निशाणा साधला आहे. काय म्हणाले संजय राऊत? शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज पुण्यातील कोविड केअर सेंटरचे उद्घाटन केले. या उद्घाटन प्रसंगी संजय राऊत यांनी म्हटलं, राज्यातले विरोधक हे एक प्रकारचे ब्लॅक फंगस आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगले काम करत आहेत त्यांची प्रेरणा घ्या. एकीकडे जागतिक आरोग्य संघटना, देशाचे पंतप्रधान राज्याच कौतुक करत आहे मात्र विरोधक राजकारण करत आहेत. तसेच दुसऱ्या लाटेत कोरोनाशी दोन हात करा, जनतेची मदत करा असा सल्लाही यावेळी संजय राऊत यांनी शिवसैनिकांना दिला आहे. पुण्यात म्युकरमाकोसिसचे किती रुग्ण? राज्यात म्युकरमाकोसिसच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. राज्यात म्युकरमाकोसिसचे सर्वाधिक रुग्ण हे पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचे एकूण 353 रुग्ण आहेत. तर म्युकरमाकोसिसने आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 212 म्युकरमाकोसिसचे रुग्ण बरे झाले आहेत. सध्या पुण्यात म्युकरमाकोसिसचे 115 रुग्ण आहेत. पंतप्रधानांकडून महाराष्ट्राचं कौतुक कोरोना विरुद्धच्या युद्दात महाराष्ट्र सरकारने केलेल्या कार्याचं काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं की, महाराष्ट्र सरकार कोरोनावर मात करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. दुसऱ्या लाटेशी महाराष्ट्र चांगली लढाई लढत आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: BJP, Coronavirus, Pune, Sanjay raut

पुढील बातम्या