मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुण्यात मनोरुग्ण भावंडांसोबत राहाणाऱ्या डॉक्टरचा कोरोनानं मृत्यू, 4 दिवस घरातच कुजत होता मृतदेह; बहिणीचंही निधन

पुण्यात मनोरुग्ण भावंडांसोबत राहाणाऱ्या डॉक्टरचा कोरोनानं मृत्यू, 4 दिवस घरातच कुजत होता मृतदेह; बहिणीचंही निधन

पुण्यात (Pune) आपल्या दोन मनोरुग्ण भावंडांसह राहाणाऱ्या नेत्ररोगतज्ज्ञाचा (Ophthalmologist) आणि त्यांच्या बहिणीचा कोरोनामुळे (Corona) मृत्यू झाला. डॉक्टरांचा मृतदेह तीन-चार दिवसांपासून घरात कुजत होता, तर त्यांची बहीण किमान एक दिवस त्याच घरात बेशुद्धावस्थेत होती.

पुढे वाचा ...

पुणे 26 एप्रिल: कोरोनामुळे अत्यंत विचित्र घटना अनुभवायला मिळत आहेत. अशात आता पुण्यात (Pune) आपल्या दोन मनोरुग्ण भावंडांसह राहाणाऱ्या नेत्ररोगतज्ज्ञाचा (Ophthalmologist) आणि त्याच्या बहिणीचा नुकताच कोरोनामुळे (Corona) मृत्यू झाला. डॉक्टरांचा मृतदेह तीन-चार दिवसांपासून घरात कुजत होता, तर त्यांची बहीण किमान एक दिवस तरी त्याच घरात बेशुद्धावस्थेत असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यांचा धाकटा भाऊ वाचला असून त्याच्या कोरोना चाचणीचा अहवाल अद्याप यायचा आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

डॉ. सुबीर सुधीर रॉय (68) (Dr Subir Sudhir Roy) असं नेत्ररोगतज्ज्ञांचं नाव असून त्यांची 65 वर्षांची बहीण गीतिका (Geetika) यांचंही निधन झालं आहे. प्रभात रोडवरच्या या फ्लॅटमध्ये ते 30 वर्षांहून अधिक काळ राहत होते, असं फ्लॅटच्या वृद्ध मालकांनी सांगितलं. त्यांचा धाकटा भाऊ संजय (60) याच्या आरटी-पीसीआर टेस्टचा अहवाल अद्याप यायचा आहे.

डेक्कन जिमखाना पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या माहितीनुसार, डॉ. रॉय त्यांच्या दोन मनोरुग्ण भावंडांसह त्या फ्लॅटमध्ये राहात होते. तिघेही अविवाहित होते. विश्रांतवाडी आणि येरवडा येथे डॉ. सुबीर यांची क्लिनिक्स होती.

वडिलांना रुग्णालयात रोज देत होते डब्बा, पण सिद्धार्थ नगरात आढळला मृतदेह

रॉय कुटुंबीयांचे पुण्यातले काही नातेवाईक एक-दोन दिवसांपासून त्यांना फोन करत होते; मात्र त्यांचा फोन उचलला जात नव्हता. शेवटी शनिवारी (24 एप्रिल) त्यांनी स्वतः जाऊन काय झालं आहे ते पाहायचं ठरवलं. दरवाजा ठोठावूनही बराच वेळ कोणीच न उघडल्यामुळे पोलिसांना कळवण्यात आलं. त्यानंतर सगळेजण आत शिरले. डॉ. रॉय यांची बेडरूम आतून बंद होती. अग्निशमन दलाला बोलावून त्या रूममध्ये प्रवेश करण्यात आला. बेडरूमच्या बाथरूममध्ये डॉ. रॉय यांचा कुजत असलेला मृतदेह आढळला.

त्यांची बहीण गीतिका बेशुद्धावस्थेत असल्याचं आढळलं. तिला तातडीने ससून हॉस्पिटलमध्ये (Sasson Hospital) दाखल करण्यात आलं. त्यानंतर तिच्या तपासणीमध्ये तसंच डॉक्टरांच्या शवविच्छेदन रिपोर्टनुसार, त्या दोघांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं. दरम्यान, शनिवारी दुपारीच गीतिका यांचं निधन झालं. डॉक्टरांचा मृत्यू तीन-चार दिवसांपूर्वी झाला असावा आणि त्यांची बहीण किमान एक दिवसभर बेशुद्धावस्थेत असावी, असा अंदाज आहे.

या दोघांचा धाकटा भाऊ संजय याचा कोरोना चाचणी अहवाल अद्याप हाती यायचा असल्याचं पोलिसांनी सांगितलं. डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचं आधी कळलं होतं का, हे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र फ्लॅटच्या तपासणीत कोरोना टेस्ट रिपोर्ट वगैरे काहीही आढळलं नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. रॉय यांचे आई-वडील 40 वर्षांपूर्वी पुण्यात आले. डॉक्टर सर्वांना मदत करायचे. संजय आणि गीतिका ही त्यांची भावंडं मनोरुग्ण होती. त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांच्यासोबतच राहाण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. अशा डॉक्टरचा आणि त्यांच्या बहिणीचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

First published:

Tags: Corona patient, Coronavirus, Pune