'ड्राय डे'च्या दिवशी पुण्यात ऑनलाइन मागवली 'दारु', असा लागला चूना

'ड्राय डे'च्या दिवशी पुण्यात ऑनलाइन मागवली 'दारु', असा लागला चूना

सुप्रीम कोर्टाने अयोध्येतील बाबरी मशीद प्रकरणाचा निकाल शनिवारी दिला. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पुणे शहरात 'ड्राय डे' जाहीर करण्यात आला होता.

  • Share this:

पुणे,10 नोव्हेंबर: पुण्यात 'ड्राय डे'च्या दिवशी ऑनलाइन 'दारु' मागवणे एकाला चांगलेच महागात पडले आहे. दारु मिळाली तर नाहीच पण ऑनलाइन फसवणूक होऊन सुमारे 50 हजार 778 रुपयांना चूना लागला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

सुप्रीम कोर्टाने अयोध्येतील बाबरी मशीद प्रकरणाचा निकाल शनिवारी दिला. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पुणे शहरात 'ड्राय डे' जाहीर करण्यात आला होता. बाहेर पोलीस बंदोबस्त व शनिवारीची सुटी अशा वेळी पियाली दुलाल कर (वय-32, रा. पेबल्स सोसायटी, बावधन) या तरूणाने घरातच बसून एन्जॉय करायचे ठरवले. त्यासाठी त्याने ऑनलाइन दारु ऑर्डर केली. पण, नंतर मोबाइलवर एसएमएसद्वारे आलेला ओटीपी फोन करणाऱ्याला सांगितला. त्याचा पियाली याला मोठा आर्थिक फटका बसला.

पियाली यांनी शनिवारी सायंकाळी त्यांनी वाईन व बिअर खरेदी करण्यासाठी ऑनलाइन घुले वाईन शॉप यांचा मोबाइल नंबरवर कॉल केला. तेव्हा फोन घेणाऱ्याने आज 'ड्राय डे' असून शॉप बंद असल्याचे सांगितले. परंतु आपण ऑनलाइन खरेदी केली तर मी आपल्या पत्यावर पाठवतो, असे सांगत समोरिल व्यक्तीने पियाली यांचा विश्वास संपादन केला. त्याला पियाली यांनी होकार दिला. त्यानंतर त्यांनी त्यांना हवे असलेल्या बिअर व वाईन यांची ऑर्डर केली. नंतर पियाली यांच्या मोबाइलवर एक ओटीपी आला. हा ओटीपी कशाचा आहे, याचा विचार न करता त्यांनी तो फोन करणाऱ्याला सांगितला. काही क्षणातच त्यांच्या बँक खात्यातून 31 हजार 777 व 19 हजार 1 रुपये असा सुमारे 50 हजार 778 रुपये काढून त्यांची फसवणूक केली.

Published by: Sandip Parolekar
First published: November 10, 2019, 1:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading