मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

फेसबुकवरील मैत्री पडली महागात; आयफोन देण्याच्या आमिषाने पुण्यातील महिलेला 4 कोटींचा गंडा

फेसबुकवरील मैत्री पडली महागात; आयफोन देण्याच्या आमिषाने पुण्यातील महिलेला 4 कोटींचा गंडा

 पुण्यातील (Pune) खासगी कंपनीमध्ये (Private Company) वरिष्ठ कार्यकारी असलेल्या 60 वर्षीय महिलेची ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) झाली आहे. वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून आयफोन देण्याचं आमिष दाखवत तब्बल 4 कोटींचा गंडा घालण्यात आला आहे.

  • Published by:  Kiran Pharate

पुणे 23 एप्रिल : फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशात आता पुण्यातून आणखी एक घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून आयफोन देण्याचं आमिष दाखवत तब्बल 4 कोटीची फसवणूक झाली आहे. पोलिसांनी गुरुवारी सांगितलं, की पुण्यातील (Pune) एका खासगी कंपनीमध्ये (Private Company) वरिष्ठ कार्यकारी असलेल्या 60 वर्षीय महिलेची ही ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेकडून फसवणूक करुन घेण्यात आलेली रक्कम मागील काही महिन्यांमध्ये 27 वेगवेगळ्या खात्यांमध्ये गेली आहे. हैराण कऱणारी गोष्ट म्हणजे 3.98 कोटीची ही रक्कम 207 वेळा ट्रान्जेक्शनमधून उडवली गेली आहे. पीडित महिलेचं वय 60 वर्ष असून त्या एका खासगी कंपनीमध्ये काम करतात.

सायबर सेलचे पोलीस अधिकारी अंकुश चिंतामन यांच्या म्हणण्यानुसार, 2020 मध्ये महिलेला ब्रिटनमधील फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली. पाच महिन्यात ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यानं महिलेसोबतची मैत्री वाढवली आणि पाच महिन्यातच महिलेचा विश्वास जिंकला. जेव्हा महिलेचा वाढदिवस आला तेव्हा या व्यक्तीनं असं सांगितलं, की त्यांनी भेटवस्तू म्हणून एक आयफोन पाठवला आहे.

जालन्यात मृत रुग्णाच्या बँक खात्यातून पैसे गायब; बोटाचे ठसे वापरुन चोरी

पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार, सप्टेंबर महिन्यात या व्यक्तीनं दिल्ली विमानतळावर गिफ्टवर असलेले सीमा शुल्क क्लियर करण्याच्या बहाण्यानं महिलेकडे मोठ्या रकमेची मागणी केली. या व्यक्तीनं महिलेला कूरिअर एजन्सी आणि कस्टम अधिकारी बनून स्वतःच फोन केला की ब्रिटनहून आलेल्या पार्सलमध्ये ज्वेलरी आणि विदेशी करंसी असल्यानं महिलेला अधिक शुल्क भरावा लागेल.

सप्टेंबर 2020 पासून आतापर्यंत महिलेची 3,98,75,500 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. नुकतंच सायबर सेलसोबत संपर्क केल्यानंतर या महिलेच्या लक्षात आलं, की आपल्यासोबत मोठी फसवणूक झाली आहे. सायबर पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करुन घेतली आहे.

First published:

Tags: Financial fraud, Online fraud, Pune crime