पुणे, 24 ऑक्टोबर : कांद्याचे भाव गगनाला भिडत आहेत. 100 रुपये कांद्याचे भाव सुरू असताना चोरांनी याचा फायदा घेण्यासाठी पुण्यात कांद्याची मोठ्या प्रमाणात चोरी करण्यात आली आहे. पुण्यातील गोदामावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. 550 किलोग्राम रुपयांचा कांदा चोरांनी लंपास केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एका चोराला पकडण्यात यश आलं आहे. तर एक जण अद्याप फरार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गावातल्या शेतकऱ्यांनी या गोदामात 38 पोती कांदा ठेवला होता. कांद्याचे वाढलेले भाव लक्षात घेऊन प्रत्येकाने दोन-दोन तास या कांद्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली. रात्री एक शेतकरी जेव्हा या कांद्याची राखण करत होता त्याच वेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरांनी कांद्याची पोती लंपास केली.
ही चोरी झालेली लक्षात येईपर्यंत चोर पोती घेऊन पसार झाले होते. त्यातल्या एका चोराला शेतकऱ्यांनी पकडलं असू पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी दोन्ही चोरट्यांना ओळखले आहे. या चोरट्यांपैकी एकाचे नाव संजय पारधी आणि दुसर्याचे नाव पोपट काळे असे आहे. शेतकर्यांच्या म्हणण्यानुसार गोदामातून 10 पोत्या बेपत्ता आहेत.
लॉकडाऊ, कोरोना आणि आता अतिवृष्टीमुळे आलेला पूर यामुळे मोठ्या प्रमाणात कांद्याचं नुकसान झालं. कांद्याचा तुटवडा झाल्यानं बाजारात भाव वाढले आणि त्यामुळे कांद्याची चोरी होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी गोडाऊनबाहेर गस्त घालायचे ठरवले. मात्र तरीही चोरांनी या गोदामावर डल्ला मारून 10 पोती पळवली असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.
गोडाऊनमधून कांदा चोरी केल्याच्या आरोपावरून दोघांवरही नारायणपूर पोलिस ठाण्यात विविध कलमांखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका चोरट्यास अटक करण्यात आली असून दुसर्याचा शोध सुरू आहे.