• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • पुण्यात पुन्हा कांदा चोरी; जुन्नर तालुक्यातील घटना, 4 तरुण अडकले

पुण्यात पुन्हा कांदा चोरी; जुन्नर तालुक्यातील घटना, 4 तरुण अडकले

कांदा चाळीतून कांदा चोरी करणाऱ्या चार जणांच्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

  • Share this:
जुन्नर, 25 ऑक्टोबर : जुन्नर तालुक्यातील डिंगोरे येथील एका शेतकऱ्याच्या कांदा चाळीतून कांदा चोरी करणाऱ्या चार जणांच्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसंच सात लाखांचा मुद्देमालही पोलिसांनी हस्तगत केला आहे. याबाबत विष्‍णू देसाई, राहणार डिंगोरे ता. जुन्नर यांनी तक्रार दिली होती. तक्रारदार वरद विष्‍णू देसाई यांच्या कांदा चाळीतील कांद्याच्या भरलेल्या पिशव्या चोरट्यांनी बराखीचे कुलूप तोडून चोरून नेल्या. याबाबत ओतूर पोलिसात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलीस पथकाने पेट्रोलिंग करत असताना सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात संशयित स्प्लेंडर गाडीवर दोन तरूण जात असताना दिसले. त्यानुसार सदर गाडी आणि तरुणांना पकडून त्यांच्याकडे चौकशी केली या चोरीबाबतचा खुलासा झाला. आरोपींना पोलिसी खाक्या दाखवला असता त्यांनी सदर कांद्याची चोरी केल्याचे कबूल केले. तसंच कांद्याच्या चाळीतून कांदे चोरताना पिकप गाडी आणि दोन दुचाकींचा वापर केला असल्याचे कबूल केले. सदर चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. कांदा पिशवी अंदाजे किंमत एक लाख 98 हजार 534, पिकअप 4 लाख, 2 दुचाकी एक लाख असा एकूण सहा लाख 98 हजार 534 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पोलिसांनी या आरोपींना जुन्नर न्यायालयात हजर केले असता त्यांना 27 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Published by:Akshay Shitole
First published: