पुणे- सोलापूर मार्गावर भीषण अपघात; पती ठार तर पत्नी, मुलगा थोडक्यात बचावले

पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या आयशर गाडीवर स्विफ्ट कार मागच्या बाजुने आदळली.

News18 Lokmat | Updated On: Nov 3, 2019 03:21 PM IST

पुणे- सोलापूर मार्गावर भीषण अपघात; पती ठार तर पत्नी, मुलगा थोडक्यात बचावले

सुमीत सोनवणे,(प्रतिनिधी)

दौंड,3 नोव्हेंबर: पुणे-सोलापूर महामार्गावर दौंड तालुक्यातील खडकी गावाजवळ भीषण अपघात झाला असून यात एकाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. अनिल मुलीया (रा. वडगाव शेरी, पुणे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अनिल मुलीया यांची पत्नी आणि मुलगा या अपघातात थोडक्यात बचावले आहे.

पुणे सोलापूर महामार्गावर दौंड तालुक्यातील खडकी गावाजवळ काळभोर वस्ती याठिकाणी आयशर आणि स्वीफ्ट गाडीचा भीषण अपघात झाला. रविवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या आयशर गाडीवर स्विफ्ट कार मागच्या बाजुने आदळली. स्विफ्टमधील ड्रायव्हर शेजारी बसलेले अनिल मुलीया यांचा जागेवरच मृत्यू झाला. ड्रायव्हर गंभीर जखमी झाला आहे. अनिल मुलीया यांची पत्नी आणि लहान मुलगा सुखरूप आहे. अनिल मुलीया हे आपल्या कुटुंबीयांसोबत हैदराबादहून पुण्याला येत असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली.

मांजरसुंबा घाटात स्कॉर्पिओ खोल दरीत कोसळली; तीन ठार

बीड जिल्ह्यातील कपीलधारकडून मांजरसुंब्याच्या घाटमार्गाने बीडकडे येणाऱ्या स्कार्पिओ गाडीला शनिवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. गाडी खोल दरीत कोसळून दोन जणांचा जागेवर तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एक गंभीर जखमी असून त्याच्यावर जिल्हा रुग्णायलयात उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास घडली.

Loading...

हरीश कांबळे (वय 30), सचिन सुरवसे (वय 32), संतोष काळे, धम्मानंद वीर व (सर्व राहणार बीड) हे फिरण्यासाठी कपीलधार येथे जात होते. यावेळी मांजरसुंबामार्गे कपीलधारकडे जात असताना घाटातील वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने स्कार्पिओ (एमएच-14 एवाय-1485) दरीत कोसळली. या भीषण अपघातामध्ये हरीश कांबळे, सचिन सुरवसे यांचा जागीच मृत्यू झाला. संतोष काळेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. धम्मानंद वीर हा गंभीर जखमी असून त्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

VIDEO:अवघ्या 20 रुपयांत पोटभर जेवण देणाऱ्या उपहारगृहाचं मेट्रोमुळे स्थलांतर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 3, 2019 03:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...