पुण्यात अंगझडती घेताना एकाकडे सापडले गावठी पिस्तूल

पुण्यात अंगझडती घेताना एकाकडे सापडले गावठी पिस्तूल

एमबी कॅम्प भागात पोलिसांनी एका संशयिताची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल तसेच एक जिवंत काडतूस सापडले.

  • Share this:

अंनिस शेख,(प्रतिनिधी)

पिंपरी-चिंचवड, 16 सप्टेंबर: देहूरोड शहरातील एमबी कॅम्प परिसरात एकाकडे गावठी पिस्तूल सापडले आहे. पोलिस नाईक प्रमोद उगले यांना खबऱ्या मार्फत ही माहिती मिळाली होती. एमबी कॅम्प भागात पोलिसांनी एका संशयिताची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल तसेच एक जिवंत काडतूस सापडले. लखन आगळे असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून पिस्तूल आणि काडतूस जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी आरोपीला  अटक करण्यात आली आहे. देहूरोड पोलीस ठाण्यात त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लखन आगळे हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शहरातील सर्वच पोलिस ठाण्याला सण-उत्सव दरम्यान सतर्क राहण्याचे आदेश पोलीस आयुक्तालयाकडून देण्यात आले आहेत. यासाठीच पोलिसांनी गोपनीय पद्धतीने शहरातील गुन्हे तसेच गुन्हेगारांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले आहे.

पत्नीच्या साडीने गळफास घेऊन पोलिस कॉन्स्टेबल पतीने संपवले जीवन

दरम्यान, माढा (जि.सोलापूर) येथे कॉन्स्टेबलने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. सुरेंद्र अजंता कटकधोंड (वय-30) असे मृत पोलिस कॉन्स्टेबलचे नाव असून माढा पोलिस स्टेशनमध्ये ते कार्यरत होते. पोलिस वसाहतीमध्ये रविवारी रात्री 9:30 वाजता सिलिंग फॅनला साडीच्या मदतीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

सुरेंद्र हे पंढरपूर शहर पोलिस ठाण्यातून माढा पोलिस स्टेशनमध्ये मे महिन्यात रुजू झाले होते. सुरेंद्र हे घरात एकटेच होते,. त्यांची पत्नी व दोन मुले वसाहती बाहेरील प्रागंणात बसले होते. दरम्यान सुरेंद्र यांनी हॉलमध्ये पत्नीच्या साडीने फॅनला गळफास घेतला. पोलिस कॉलनीत असलेल्या महिलांना सुरेंद्र हे पख्याला लटकत असल्याचे पाहिल्यानंतर त्यांनी घटना त्यांच्या पत्नी आणि माढा पोलिसांना सांगितली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन सुरेंद्र यांचा पंचनामा केला आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपविभागीय अधिकारी सिद्धेश्वर भोरे यानी घटनास्थळी भेट दिली. सुरेद्र यांच्या पश्चात 3 वर्षांची मुलगी, पाच वर्षीय मुलगा, पत्नी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, पोलिस स्टेशनमध्ये गणपती विसर्जनाच्या बंदोबस्ताच्या कारणावरून 12 ऑगस्ट रोजी सुरेंद्र यांचा एका पोलिस अधिकाऱ्यांसोबत वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे.

VIDEO: 'या' कारणामुळे मनसेला आघाडीमध्ये जागा नाही, शरद पवारांनी केलं स्पष्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 16, 2019 05:50 PM IST

ताज्या बातम्या