पाणी जपून वापरा, पुणेकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी

पाणी जपून वापरा, पुणेकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी

उद्या संपूर्ण दिवस पाणी येणार नसल्याने आज आणि उद्या पुरले इतकं पाणी भरून ठेवा.

  • Share this:

पुणे, 06 फेब्रुवारी : पुणेकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे उद्या गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे उद्या कोणाच्याही नळाला पाणी येणार नाही. अशी सूचना पुणे महापालिकेडून जारी करण्यात आली आहे.

उद्या संपूर्ण दिवस पाणी येणार नसल्याने आज आणि उद्या पुरले इतकं पाणी भरून ठेवा. त्याचबरोबर पाण्याचा अपव्यय टाळा असंही पालिकेकडून सांगण्यात आलं आहे.

देखभाल आणि दुरूस्तीच्या कामासाठी पुण्यात  पाणीपुरवठा बंद करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर शुक्रवारीदेखील कमीदाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती जारी करण्यात आली आहे.

यावेळी जलशुद्धीकरण आणि दुरूस्तीची कामं पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणेकरांनी पुढचे दोन दिवस पाण्याचे योग्य नियोजन करा.  दरम्यान, गेल्या काही दिवसांआधी नवी मुंबईतदेखील पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता. भोकरपाडा इथून होणाऱ्या पाण्याचं जलशुद्धीकरण करण्यासाठी पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता.

SPECIAL REPORT : भिवंडीत कमळ पुन्हा उमलणार का?

 

 

 

 

First published: February 6, 2019, 9:36 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading