पोलिसांशी अरेरावी, मग पाठलाग अन् गुंडांनी 20 फूट दरीत उतरवली कार, सापडले कोयते!

पोलिसांशी अरेरावी, मग पाठलाग अन् गुंडांनी 20 फूट दरीत उतरवली कार, सापडले कोयते!

मागे येत असलेले पोलीस तसंच पुढे असलेली नाकाबंदी ही बाब कारमधील तिघांना लक्षात आल्यावर त्यांनी दस्तुरी गावाजवळील 20 फूट खोल दरीत कार उतरवली.

  • Share this:

आनिस शेख, प्रतिनिधी

मावळ, 17 एप्रिल : राज्यात लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) लागू असल्यामुळे महामार्गावरील वाहतूक मंदावली आहे. पुणे एक्स्प्रेस वेवर (Mumbai-Pune Express way) पोलिसांच्या नाकाबंदीदरम्यान तपासणी करताना थरारक घटना घडली. एका मारुती स्विफ्ट (Marauti Swift car) गाडीतून धारदार शस्त्रसाठा आढळून आला. पण पोलिसांच्या तावडीतून गाडीतील गुंड पळून गेले.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारकडून संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील वाहनांची संख्या देखील घटली आहे. महामार्गावर मुंबई आणि पुणे असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची नाकाबंदी दरम्यान पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.

राज्यातील Oxygen तुटवडा होणार लवकरच दूर, रेल्वेने होणार पुरवठा

खालापूर टोल नाक्यावर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास महामार्ग पोलिसांनी लावलेल्या नाकाबंदी दरम्यान मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या एम एच 02 BJ 6268या स्विफ्टला थांबून  वाहन तपासणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, संबंधित वाहनांमधील असलेल्या तिघांनी पोलिसांशी अरेरावी तसंच हुज्जत करत  स्विफ्ट कार पुण्याच्या दिशेने पळविली.

संबंधित कारवर पोलिसांचा संशय बाळगल्याने महामार्ग पोलिसांनी पुढे दस्तुरी गावाजवळ असलेल्या चेक पोस्टवर नाकाबंदी करण्याचे आदेश दिले तसंच स्विफ्ट कारचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. मागे येत असलेले पोलीस तसेच पुढे असलेली नाकाबंदी ही बाब कारमधील तिघांना लक्षात आल्यावर त्यांनी दस्तुरी गावाजवळील 20 फूट खोल दरीत कार उतरवली. काही दूर गेल्यानंतर शिंग्रोबा मंदिराजवळ असलेल्या जंगलात पोलिसांना गुंगारा देऊन पळून जाण्यात तिघेही यशस्वी झाले.

CORONA LOCKDOWN : पाहा तुमच्या फेव्हरेट अभिनेत्री सध्या घरात काय करतायेत?पोलिसांनी संशयास्पद असलेल्या स्विफ्ट कारची झाडाझडती घेतली असता कारमधून तीक्ष्ण हत्यारे पोलिसांना आढळून आले आहेत. त्यानुसार, खोपोली पोलिसांनी वेगवेगळे पथक तयार करून तिघां आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Published by: sachin Salve
First published: April 17, 2021, 10:24 PM IST

ताज्या बातम्या