पुणे, 5 डिसेंबर : पुण्यातील (Pune) एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये फ्लायओव्हरवरील गाडीने पेट घेत असल्याचे दिसून येत आहे. पुण्यातील माई मंगेशकर रुग्णालयाच्याजवळील (Mai Mangeshkar Hospital) फ्लायओव्हरवर गाडीने अचानक पेट घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
सायंकाळी नोकरदार वर्ग घरी जात असल्याने रस्त्यावर गर्दी आहे. त्यात फ्लायओव्हरवर ही घटना घडल्याने रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा झाला. बराच काळ ही गाडी पेटत होती. प्रसंगावधान राखून मागून येणाऱ्या वाहनांना तातडीने रोखण्यात आले. या अपघातात कोणताही जीवित हानी झाली नसल्याचे सांगितले जात आहे. सायंकाळची वेळ असल्याने या अपघातामुळे पुणेकरांना वाहतुकीच्या खोळंब्याचा सामना करावा लागला.
पुण्यातील माई मंगेशकर रुग्णालयाजवळील फ्लायओव्हरवर गाडीने घेतला पेट; पाहा VIDEO pic.twitter.com/g8KhjWpxQe