Home /News /pune /

अजित पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट, 'त्या' महिलेवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून गुन्हा दाखल

अजित पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट, 'त्या' महिलेवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून गुन्हा दाखल

स्वप्नील गायकवाड यांच्या तक्रारीवरुन चाकण येथील संगीता वानखेडे या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे, 18 जुलै : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत आक्षेपहार्य वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये चाकणच्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपहार्य  विधान करून ती पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करत बदणामी केल्याबाबत राष्ट्रवादीच्या शिरुर तालुक्यातील कोंढापुरी ग्रामपंचायतचे सरपंच स्वप्नील गायकवाड या कार्यकर्त्याकडून शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याच्यावर कोरोनाचा उपचार करू नका, वाचला तर भरचौकात फासावर लटकवा, मनसेची मागणी स्वप्नील गायकवाड यांच्या तक्रारीवरुन चाकण येथील संगीता वानखेडे या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतीत  मिळालेल्या  माहितीनुसार, मुंबई येथे सारथी संस्थेच्या बाबतीत अजित पवार आणि इतर नेत्यांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर संध्याकाळी फेसबुकवर  लाइव्ह व्हिडिओ करून महिलेनं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि इतर नेत्यांबाबत अत्यंत खालच्या पातळी आक्षेपहार्य वक्तव्य केले होते. कचरा कुंडीजवळ भलामोठा दगड आणि तरुणाचा मृतदेह, नागपूर पुन्हा हादरलं याबाबत शिरूर येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चर्चा करून शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आला. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस करत आहेत.
Published by:sachin Salve
First published:

Tags: अजित पवार, जुन्नर, फेसबुक, राष्ट्रवादी

पुढील बातम्या