Home /News /pune /

OBC Political Reservation: ओबीसी परिषदेत नेत्यांचे एकमेकांकडे बोट; आता पुढे काय?

OBC Political Reservation: ओबीसी परिषदेत नेत्यांचे एकमेकांकडे बोट; आता पुढे काय?

इतर मागासवर्गीय समाजाचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर ओबीसी समाजाच्या वतीने पुढील दिशा ठरवण्यासाठी ओबीसी परिषदेचं आयोजन केलं होतं.

लोणावळा, 27 जून: ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी आणि सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेल्या राजकीय आरक्षणाच्या भवितव्यासाठी पुणे जिल्ह्यातील लोणावळा (Lonavala) येथे ओबीसी महासंघाने दोन दिवसाचं ओबीसी परिषद (OBC Council) आयोजित केली होती. या परिषदेचे उद्घाटन राष्ट्रवादीचे नेते ओबीसी नेतृत्व करत असलेले छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. या ओबीसी परिषदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्व ओबीसी नेत्यांनी सहभाग घेतला खरा मात्र, सर्व नेते एकमेकांकडे बोट दाखवताना दिसून आले. भुजबळांच्या आरोपावर बावनकुळेंची प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी तत्कालीन देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री असलेल्या कार्यकाळात यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षण रद्द होण्यास कारणीभूत असल्याचा आरोप केला होता. विशेष म्हणजे भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी फडणीस यांनी काढलेल्या अध्यादेशावर सही करू नये असा आरोप देखील भुजबळ यांनी केला. अर्थात दुसऱ्या दिवशी चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसी परिषदेत उपस्थित राहात भुजबळ यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना यांच्याविषयी आदर आहे पण ते कुणाच्यातरी राजकीय दबावामुळे खोटी माहिती सांगत आहेत. भाजपने ओबीसी आरक्षण देण्यासाठी वारंवार प्रयत्न केले पण मागील दोन वर्षात महाविकास आघाडी सरकारने काहीही केले नाही म्हणून राजकीय आरक्षण रद्द झाल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला. चार महिन्यात आरक्षण देतो म्हणणाऱ्या फडणवीसांना नाना पटोलेंचा सणसणीत टोला पंकजा मुंडेंचे राज्य सरकारकडे बोट दुसरीकडे ओबीसी परिषदेला उपस्थित असणारे पंकजा मुंडे यांनी देखील ओबीसी जनगणना राज्याने कोर्टात सादर करणे गरजेचे आहे. तोपर्यंत निवडणूक घेऊ नये, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लागलेल्या निवडणुका तोपर्यंत घेतल्या जाणार नाहीत यासाठी सत्ताधारी महाविकासआघाडी नेत्यांनी प्रयत्न केले पाहिजे. पंकजा मुंडे यांनी असे सांगत राज्य सरकारची जबाबदारी असल्याचे बोट दाखवले. 'भुजबळ साहेब तसं म्हणाले नाही', OBC परिषदेत भाजप नेत्याच्या भाषणात घोषणाबाजी पंकजा मुंडे आणि बावनकुळे यांना प्रत्युत्तर देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विनाकारण केंद्र सरकार कोर्टात ओबीसी जनगणनाचा डाटा देत नाही यामुळेच आरक्षण मिळत नसल्याचा आरोप करत भाजपावर टीका केली. तर दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांनी देखील राज्य सरकार ओबीसीच्या हितासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा करत केंद्र सरकारकडे कळत नकळत बोट दाखवले. एकूणच दोन दिवसाच्या पक्षविरहित ओबीसी परिषदेला भलेही वेगवेगळ्या पक्षाचे नेते एकत्र आले असले तरी प्रत्येक पक्षाची झूल पाठीवर ठेवतच सत्ताधारी बाकावर नेत्यांनी राज्य सरकारकडे जबाबदारी नाही तर केंद्र सरकारकडे जबाबदारी आहे असे सांगितले. तर दुसरीकडे भाजपाच्या ओबीसी नेत्यांनी राज्य सरकारकडे बोट दाखवले एकूणच दोन दिवस सुरू असलेली ओबीसी परिषद ने त्यांनी एकमेकांकडे बोट दाखवत स्वतःची जबाबदारी ढकलून देण्याचा प्रयत्न केला. आता भविष्यात नेमका ओबीसी समाज काय करणार मराठा समाजाप्रमाणे राजकीय संघर्ष रस्त्यावर करणार का याकडे लक्ष आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: BJP, Congress, NCP, Pune

पुढील बातम्या