लोणावळा, 26 जून : स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत ओबीसी आरक्षण (obc reservation) रद्द झाल्यामुळे एकीकडे भाजप चक्का जाम आंदोलन करत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी लोणावळ्यात सुरू असलेल्या ओबीसी आरक्षण परिषदेत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांच्याबाबत धक्कादायक विधान केले आहे.
लोणावळ्यात महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांकडून लोणावळ्यात ओबीसी परिषदेचं आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बोलत असताना छगन भुजबळ यांनी भाजप नेत्यांवर टीका केली.
सौ चुहे खाके बिल्ली हज को चली', जयंत पाटलांचा भाजपला सणसणीत टोला
'तुम्ही आंदोलन रस्त्यावर करत आहात, त्याचे स्वागत आहे. फडणवीस यांनी हा विषय पंतप्रधान मोदींकडे न्यावा आणि समाजला न्याय द्यावा. सत्तेत असताना देवेंद्र फडणवीस यांनी जो अध्यादेश काढला होता. त्यावर सही करू नका असं भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मला येऊन सांगितलं होतं, असा खुलासा छगन भुजबळ यांनी केला.
'पाच वर्ष सगळी कामे करून घेतात. निवडणूक आली की म्हणतात ही माळी कुंभार वंजारी. आमचा मतदार संघ राखीव नाही त्याच कारण आमच्या मतदारसंघात कोणी उभे राहू शकतात, मतदारसंघात जाव लागते सगळ्यांना बरोबर घ्याव लागतं, हे ही समाजाने समजून घेतले पाहिजे, असंही भुजबळ म्हणाले.
'इम्पॅरिकल डाटा कोणाची खासगी मालमत्ता नाही, कोर्टात केंद्र सरकार ओबीसी डाटा सादर का करत नाही. जो डेटा आहे ती कोणाच्या घरची संपती नाही. तो दिला पाहिजे. डेटा ठेऊन काय पुजायच आहे का? मी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. ओबीसी राजकीय आरक्षणाचा निर्णय हा संपूर्ण देशाला लागू आहे म्हणून तुम्ही मोदी यांना भेटा. तुमचं नेतृत्व मान्य करायला आम्ही तयार आहे', असंही भुजबळ म्हणाले.
'छगन भुजबळ घाबरत नाही कोणाला. खूप हातोडे झेलले आहेत. मित्रांच्या आणि काही मित्रांच्या कृपेमुळे मी जेलमध्ये जाऊन आलो. जाती म्हणून काही मिळणार नाही पण ओबीसी समाज म्हणून एकत्रित आलa तर नक्की चांगले मिळेल, असंही भुजबळ म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.