'मम्मी माझी काळजी करू नको'; 5 वर्षांच्या मुलाने पुण्याच्या कोरोना वॉरिअर आईला दिलं मोठं बळ

'मम्मी माझी काळजी करू नको'; 5 वर्षांच्या मुलाने पुण्याच्या कोरोना वॉरिअर आईला दिलं मोठं बळ

राज्यातले पहिले दोन कोरोनाग्रस्त रुग्ण हाताळणाऱ्या पुण्याच्या नायडू रुग्णालयातल्या नर्स दीपाली पिंगळे यांनी News18lokmat.com शी त्यांचे अस्वस्थ करणारे अनुभव शेअर केले.

  • Share this:

पुणे, 17 एप्रिल : पुण्याच्या नायडू हॉस्पिटलमध्ये कोरोना वॉर्डमध्ये कार्यरत असणाऱ्या नर्स दीपाली पिंगळे यांनी राज्यातल्या पहिल्या कोरोनाग्रस्ताची रुग्णसेवा करतानाचे अनुभव News18 lokmat वेबसाइटशी शेअर केले. पुण्यात दुबईहून आलेल्या एका दांपत्याला पहिल्यांदा कोरोनाचा संसर्ग झाल्याचं उघड झालं. त्या वेळी नायडू रुग्णालयात त्यांची सुश्रुषा दीपाली पिंगळे कामथे यांनी केली होती.

दीपाली गेली 10 वर्षं पुण्यात डाॅ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत आहेत. कोरोनासारख्या घातक आजाराचे रुग्णांमध्ये सतत त्यांना वावरावं लागतं. त्यामुळे आपल्यापासून मुलाला संसर्गाचा धोका नको या विचाराने त्यांनी मुलाला गेलं महिनाभर स्वतःपासून दूर ठेवलं. दीपाली यांचा मुलगा आजीकडे राहतो आणि फक्त व्हिडीओ कॉलवरच आईला भेटू शकतो. हा काळ कठीण असल्याचं दीपाली सांगतात. पण कुटुंबाची साथ असल्याने कोरोनाचा लढा धीराने लढते आहे, असं त्यांनी news18lokmat.com शी बोलताना सांगितलं.

सुरुवातीच्या अनुभवाविषयी त्या सांगतात, "रोज HIV, TB चे पेशंट हाताळण्याचा अनुभव पाठीशी होता तरीही कोरोनाविषयी मनामधील भीती जात नव्हती. माझे पती रमेश पिंगळे देखील माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून माझे मनोबल वाढवत होते.  पण माझ्या 5 वर्षांच्या मुलाचं काय, हा ही प्रश्न समोर उभा होता. पण मुलाने - अवधूतने समजूतदारपणे स्वतःहून सांगितलं, 'मम्मी मी राहीन मामाकडे. तू माझी नको काळजी करू.' माझ्या कुटुंबीयांना आधार दिल्यामुळे मनावरील ताणही कमी झाला आणि  एक प्रकारची प्रेरणा मिळाली. मी कोरोनोग्रस्त वॉर्डमध्ये ड्युटीवर सेवा करण्यासाठी हजर झाले."

वाचा - पुणेकरांनो सावधान! मुंबईच्या धारावीसारखे पुण्याच्या या भागात सापडताहेत सर्वाधिक

कोरोनाचा पहिलाच रुग्ण चाचणी पॉझिटिव्ह झाल्यानंतर दीपाली यांच्या देखरेखीखाली आला. "त्या दिवशी 9 मार्चला रात्री 8 वाजता माझी नाईट ड्युटी संशयित कोरोनोग्रस्तांच्या वार्डमध्ये होती. मला रात्री 7.45 वाजता समजलं की, आपल्या हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या दाम्पत्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे आणि ते राज्यातलं पहिलं कोरोनाग्रस्त दांपत्य ठरलं आहे. क्षणभर मला खूप घाबरल्यासारख  वाटलं. कारण रोज टीव्हीवर चीन, इटली, स्पेन, अमेरिका यांची अवस्था पाहत होते. या आजारावर उपचार नाही हेही माहीत होतं."

"आम्ही YouTube वरून वेगवेगळ्या देशात कोरोनारुग्णांची कशी काळजी घेतात ते पाहात होतं. आम्हाला याविषयी वरिष्ठांनी आणि तज्ज्ञांनी माहिती दिली होती. त्यानुसार आम्ही हे रुग्ण हाताळले. पण पहिल्या रुग्णाजवळ जायचं आव्हान मोठं होतं", त्या सांगतात.

पहिलं आव्हान

"वॉर्डमध्ये गेल्यावर माझ्यापुढे पहिलं आव्हान होतं ते म्हणजे कोरोनोग्रस्त दाम्पत्याला धीर देणं आणि कोरोनो हा आजार बरा होऊ शकतो असा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण करणं. त्यांचं मनोबल वाढवणं. माझ्या समोर दुसरं आव्हान होतं ते म्हणजे 12 तास प्रोटेक्टिव्ह किट घालावी लागणार होती.

"माझ्यामुळे हा रोग इतरांना होऊ नये याचीही मला काळजी घ्यायची होती. हा ड्रेस  परिधान केल्यावर जो अनुभव होता तो खूपच भयानक होता. डबल मास्क घातल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होत होता. शूज कव्हरचं इलास्टिक सारखं खाली सरकत होतं. पाॅलिथीन कीटमुळे घामानेच अंघोळ झाली होती. त्यात माझ्या डाव्या पायाचं नुकतंच ऑपरेशन झाल्यामुळे पाय सुजला होता आणि वेदनाही होत होत्या. पण या सगळ्याचा विचार न करता मी माझे रुग्णसेवेचं कर्तव्य पार पाडलं.  सतत काही ना काही कारणाने पेशंट जवळ जावं लागत होतं. त्यामुळे किट काढता येत नव्हतं. किट काढलं आणि जर चुकून पेशंटजवळ गेले तर मलाही कोरोनो होऊ शकतो या भीतीने किटही काढता येत नव्हतं."

"पाणी पिण्याची इच्छा असूनसुद्धा पाणी पिता आलं नाही. चहा प्यायची  इच्छा असूनही चहा पिता आला नाही", असं दीपाली सांगतात.

वाचा - शेवटी आईच ती... आजारी मुलाच्या काळजीमुळे आईने 6 राज्यातून केला 2700 किमी प्रवास

"फक्त एकच विनंती आहे की 3 तारखेपर्यंत घरातच बसा. आम्ही सर्व आरोग्य कर्मचारी स्वःताहाच्या जिवाची पर्वा न करता आणि आमच्या कुटुंबियांची पर्वा न करता २४ तास तुम्हा सर्वांना रुग्ण सेवा देण्यासाठी हॉस्पिटल मध्ये  आहोत,  फक्त आपल्या सहकार्याची गरज आहे. कोरोनो बरा होऊ शकतो, फक्त सरकारच्या सूचनांचे पालन करा, आपण सर्व जण मिळून या कोरोनाचे युद्ध नक्कीच जिंकू आणि कोरोनाला आपल्या देशांतून हद्दपार करू असा मला विश्वास आहे. हा " मानव जन्म पुन्हा मिळणार नाही" हे लक्षात ठेवा.

(संपादन - अरुंधती)

अन्य बातम्या

'डॅडा ना तिकडे राहतो...' पोलीस बापाचा 2 वर्षाच्या मुलाशी निशब्द करणारा संवाद

IPS बायको कोरोनाशी लढतेय तर सध्या नवरा काय करतोय? सातारा SP नी शेअर केला भावुक करणारा VIDEO

गर्भवती महिलेला मिळाली नाही Ambulance, पोलिस जीपमध्ये दिला मुलाला जन्म

First published: April 18, 2020, 10:34 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading