पुणे, 5 डिसेंबर : गेल्या आठवड्यात मनसेचा शहर पदाधिकारी मेळावा पार पडला. या मेळाव्याला मनसे नेते वसंत मोरे यांची देखील उपस्थिती होती. मात्र, शहर पदाधिकारी मेळाव्याला उपस्थित असूनही मेळाव्यात त्यांना बोलण्याची संधी न दिल्यानं ते नाराज झाले आहेत. कोअर कमिटीत असूनही भाषणाची संधी मिळत नसेल तर ही कोअर कमिटी आमची फक्त ठासायला आहे का ? असा संतप्त सवाल वसंत मोरे यांनी केला आहे. राज ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसेतील दुफळी समोर आली होती. यानंतर नाराज झालेल्या मनसेचे पुण्याचे नेते वंसत मोरेंना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवारांकडून ॲाफर देण्यात आली आहे. यानंतर वसंत मोरे राष्ट्रवादीमध्ये जाणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
काय म्हणाले वसंत मोरे -
राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी खुली ॲाफर दिल्याची स्पष्टीकरण वसंत मोरे यांनी दिले आहे. मला दादा म्हटले, "तात्या तिकडे नाराज आहात तर एकदा या इकडे, मी वाट बघतोय....या आमच्याकडे..." हा माझ्या कामाचा गौरव आहे. याअगोदरही मला ऑफर दिली होती.
माझा पक्ष बदलण्याचा विचार नाही. मी पक्ष नेतृत्वावर नाराज नाही. स्थानिक नेते मला काही करू देत नाही आहे. मला डावलले जात आहे, भाषण करून दिले जात नाही, राजसाहेब दखल घेत नाही, यांची खंत आहे. मला बाजूला ठेवलं जातंय, असा आरोप त्यांनी केला.
तसेच यातून काही साध्य होणार नाही, पण पक्ष डॅमेज होईल. चंद्रकातदादा पण मला बोलवता ना, मनसेचे तात्या इकडे या, असे बोलले. माझ्यावर शिक्का पडला आहे. माझ्याच नेत्यांना मला एकटं पाडायचे आहे. त्यांना बहुतेक माझी प्रसिद्धी खुपतेय. मी पक्ष सोडणार नाही, पण वेदना होतात. बाकी पक्ष माझ्या कामाची दखल घेतात. पण माझेच सहकारी मला पक्षाबाहेर ढकलू पाहताहेत हे खूप वेदनादायी आहे.
हेही वाचा - मोठी बातमी! राज ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसेतील दुफळी समोर
माझ्या समर्थकांची हकालपट्टी केली जाते. मला व्यासपीठावर बोलावतात पण बोलू देत नाहीत. आज मनसेत आहे पण उद्याचं काय हे वेळच ठरवेल, असा इशाराही मनसेतील नाराज नेते वसंत मोरे यांनी दिला आहे. राज ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसेतील दुफळी समोर आली होती. यानंतर नाराज झालेल्या मनसेचे पुण्याचे नेते वंसत मोरेंना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवारांकडून ॲाफर देण्यात आली आहे. यानंतर वसंत मोरे राष्ट्रवादीमध्ये जाणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, Maharashtra politics, MNS, NCP, Pune, Raj Thackeray