'पद्मावत' चित्रपटगृहात, पण थिएटर्सवर पोस्टर्स नाहीत

'पद्मावत' चित्रपटगृहात, पण थिएटर्सवर पोस्टर्स नाहीत

सिनेमाचे प्रीव्ह्यू शो सुरू झाले तरी कुठल्याच सिनेमागृहाबाहेर पद्मावतच्या जाहिरातीसाठीचं पोस्टर लावण्यात आलेलं नाही. त्यामुळे सिनेमा दाखवणार जरी असले तरी थिएटर्सच्या सिनेमागृहाची काळजी मात्र मालकांना सतावतेय .

  • Share this:

पुणे, 24 जानेवारी : पद्मावत सिनेमाला करणीसेनेकडून होणारा विरोध लक्षात घेता पद्मावत रिलीजनंतर शहरात कायदासुव्यवस्थेची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे,मात्र सर्वोच्च न्यायलयाचे आदेश असल्याने पोलिस बंदोबस्तात हा सिनेमा रिलीज होतोय. मात्र सिनेमाचे प्रीव्ह्यू शो सुरू झाले तरी कुठल्याच सिनेमागृहाबाहेर पद्मावतच्या जाहिरातीसाठीचं पोस्टर लावण्यात आलेलं नाही. त्यामुळे सिनेमा दाखवणार जरी असले तरी थिएटर्सच्या सिनेमागृहाची काळजी मात्र मालकांना सतावतेय .

दरम्यान पद्मावत पाहून अनेक समीक्षकांनी सिनेमाचं तोंडभरून कौतुक केलंय.संजय लीला भंसाळी यांचं संगीत आणि दिग्दर्शन असलेला सिनेविश्वातला हा आणखी एक मैलाचा दगड म्हणावा लागेल. कारण ज्या भव्यदिव्य आणि नेत्रदिपक पद्धतीने त्यांनी राणी पद्मावतीची कथा यात दाखवलीय, ती डोळ्याचं पारणं फेडणारी आहे. रणवीर सिंग, दीपिका पदूकोण यांचा अभिनय अतिशय दमदार आहे. तर शाहिद कपूरने त्याची भूमिका चोखपणे निभावली असली तरीही रणवीर-दीपिका यांच्या तुलनेत तो थोडा कमी पडतो असं वाटत राहतं.

'व्हीएफएक्स'चा उत्तम वापर करण्यात आलाय. युद्धांचे प्रसंग प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरतील. एकंदर राजपूतांचा गौरव दाखवणारी ही प्रेमकथा आणि शौर्यकथा 25 जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. पद्मावत हा सिनेमा मलिक मोहम्मद जायसी यांच्या पद्मावत या महाकाव्यावरून प्रेरित आहे. संजय लीला भंसाळींचा हा एपिक ड्रामा चुकवू नये, हे मात्र नक्की.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 24, 2018 01:38 PM IST

ताज्या बातम्या