पुणेकर नाराज, मंत्रीमंडळ विस्तारात एकही मंत्रिपद नाही!

पुणेकर नाराज, मंत्रीमंडळ विस्तारात एकही मंत्रिपद नाही!

पुणेकरांचे प्रश्न आता नेमके सोडवणार कोण? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला.

  • Share this:

चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी

पुणे, 17 जून : मंत्रीमंडळ विस्तारात पुण्याला एकही मंञिपद न मिळाल्याने पुणेकरांमध्ये काहिशी नाराजी बघायला मिळते. लोकसभेतही पुणेकरांनी भाजपला भरभरून मतदान केलं. त्याच जोरावर पुण्याचे माजी पालकमंञी गिरीष बापट खासदारही बनले. त्यामुळे मंञीमंडळ विस्तारात पुण्याला नक्कीच एक-दोन मंञीपदं मिळतील अशी अपेक्षा होती पण प्रत्यक्षात झालं उलटंच.

पुण्याला जास्तीचं मंञीपद तर मिळालंच नाही उलट दिलीप कांबळेंचं राज्यमंञीपदही काढून घेण्यात आलं. तर तसंच पुण्याचं पालकमंञीपदही चंद्रकांत पाटलांसारख्या शहराबाहेरच्या मंञ्याकडे सोपवण्यात आलं. त्यामुळे पुणेकरांचे प्रश्न आता नेमके सोडवणार कोण? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला.

भाजपच्या शहराध्यक्षांना माञ पुणेकरांना मंञीपद न मिळण्यात काहीच गैर वाटत नाही. मावळमधून पार्थ पवारला पराभूत केलं म्हणून बाळा भेगडेंना राज्यमंञीपद देण्यात आलं. बारामतीत पवारांची कोंडी केली म्हणून चंद्रकांत पाटलांना पुण्याचा कारभारी बनवण्यात आलं. पण त्या नादात पुणेकर माञ नकळतपणे मंञीमंडळातूनच उणे झालेत असंच म्हणावं लागेल.

संसदेत जय श्रीरामचे नारे नको, नवनीत राणांची मागणी या आणि इतर टॉप 18 बातम्या

First published: June 17, 2019, 8:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading