पुणे, 02 ऑगस्ट : पुण्यात कोरोना आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अशात राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे पुण्यातील राञीची कोरोना संचारबंदीही अखेर आज राञीपासून उठवण्यात आली आहे. या चाडेचार महिन्यांच्या संचारबंदी काळात पुणे पोलिसांनी तब्बल 56 हजार गुन्हे दाखल केले असून 50 हजार दूचाकी जप्त केल्या आहेत.
दरम्यान, आजपासून पुणे शहरातील संचारबंदी कायमस्वरूपी हटणार असली तरी मास्क सक्ती आणि सोशल डिस्टंटची कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचं पुणे शहर सहपोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. मुंबईपाठोपाठ पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
HSC मार्कशीट आणि शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी मुंबईमध्ये शाळा उघडल्या...
पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता लाखाकडे वाटचाल करत आहे. पुण्यात रात्रभरातून तब्बल 277 रुग्णांची वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही तब्बल 88861वर पोहोचली आहे. धक्कादायक म्हणजे, पुण्यात आला मृतांची आकडेवारी वाढली आहे. मृतांचा आकडा दोन हजार पार झाला आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे 2035 जणांचा मृत्यू झाला आहे.
धक्कादायक! 3 युवकांनी कापला अपंग मुलाचा प्रायव्हेट पार्ट, प्रकृती नाजूक
तर महाराष्ट्रात शनिवारी तब्बल 10 हजार कोरोना रुग्णांना 24 तासांमध्ये डिस्चार्ज देण्यात आला. तर नव्याने 9,601 रुग्ण सापडले आहे. तर रुग्णांच्या मृत्यूची संख्या वाढली असून शनिवारी 322 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आत्तापर्यंतच्या मृत्यूची संख्या ही 15,316वर गेली असून एकूण रुग्ण 4,31,719 एवढे झाले आहेत. राज्यात 1,49,214 रुग्ण आहेत त्यातले 46,345 रुग्ण हे पुण्यात आहेत. मुंबईत 1,059 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 45 जणांचा मृत्यू झाला. शहरात 20,749 सक्रिय रुग्ण आहेत. तर मृत्यूचा आकडा 6,395 वर पोहोचला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.