Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

अजितदादांना सकाळी - सकाळी नितीन गडकरींचा फोन आला आणि म्हणाले...

अजितदादांना सकाळी - सकाळी नितीन गडकरींचा फोन आला आणि म्हणाले...

Nitin Gadkari calls to Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज सकाळीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फोन केला.

Nitin Gadkari calls to Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज सकाळीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फोन केला.

Nitin Gadkari calls to Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज सकाळीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फोन केला.

पुणे, 24 सप्टेंबर : पुण्यात (Pune) आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांच्या हस्ते दोन उड्डाणपुलांचे भूमिपूजन पार पडले. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar), खासदार सुप्रिया सुळे, निलम गोऱ्हे, चंद्रकांत पाटील सुद्दा उपस्थित होते. यावेळी भाषणाला सुरुवात करताच अजित पवारांनी म्हटलं, मी पालकमंत्री म्हणून गडकरी साहेबाना पुण्याच्या तमाम जनतेकडून शुभेच्छा देतो.

सकाळी गडकरी साहेबांचा फोन आला...

अजित पवार म्हणाले, मला मध्यंतरी गडकरींनी सांगितलं होतं मी मुंबईत येतो... उद्धवजी ठाकरे साहेब, तू, अशोक चव्हाण, स्वत: गडकरी साहेब आणि त्यांची अधिकाऱ्यांची टीम... राज्य सरकारमधील काही प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत किंवा दोगांच्या समन्वयातील प्रश्न सोडवण्यासाठी निर्णय घेण्याची गरज आहे. त्याबाबतची मिटींग लावा. काल मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की, उद्या गडकरी साहेबांसोबत दोन कार्यक्रम आहेत. सीएम साहेबांनी सांगितलं, गडकरी साहेबांना जी वेळ सोईची आहे ती सांगावी, सह्याद्रीवर तशी मिटींग आयोजित करु.

मुख्यमंत्री आणि शरद पवारांमध्ये सह्याद्रीवर चर्चा; बैठकीत भेटीमागे दडलंय काय?

अजित पवारांनी पुढे म्हटलं, आत्तापण सकाळी गडकरी साहेबांचा फोन आला की अजित जरा 15 मिनिटे लवकर ये. पुलाच्या डिझाइनवर बोलायचं आहे. आपण यामध्ये काही वेगळ्या पद्धतीने विचार करत आहोत.

राजकारणाच्या ठिकाणी राजकारण नक्कीच करु पण ज्यावेळी निवडणुका संपतात त्यावेळी जनतेने निवडून दिलेले जे लोकप्रतिनिधी असतात त्यांना विश्वासात घेऊन विकासकामात अडथळा न आणता आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे असंही अजित पवार म्हणाले.

अ‍ॅम्ब्युलन्सच्या सायरनचा आवाज लवकरच बदलणार - गडकरी

ध्वनी आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी भारतातील सर्व गाड्यांचे कर्णकर्कश हॉर्न बदलून वाद्यांचे मधूर आवाज असलेले हॉर्न लवकरच लावण्यात येणार आहेत. नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वीच याबाबतची माहिती दिली होती त्यानंतर आता अ‍ॅम्ब्युलन्सच्या सायरनचा आवाज बदलण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. लवकरच या संदर्भात आदेश काढण्यात येणार असल्याचं गडकरींनी पुण्यातील कार्यक्रमात म्हटलं आहे.

अ‍ॅम्ब्युलन्सच्या सायरनवर आकाशवाणीची धून

नितीन गडकरी म्हणाले, "मी सर्व मंत्र्यांचे हॉर्न बदलले, लाल दिवे काढून टाकले. आता पोलीस आणि अ‍ॅम्ब्युलन्सचे आहेत. मी नागपुरात 18व्या मजल्यावर फ्लॅटमध्ये राहतो. रोज एकतास प्राणायम करतो, तेव्हा मला पहिल्यांदा लक्षात की साऊंडमुळे किती त्रास होतो. मेडिकल सायन्सप्रमाणे याचा एक दुष्परिणाम आहे आपल्यावर. डॉक्टरची बिलं आपण भरतो याचं कारण वायू प्रदुषण, पाणी प्रदुषण आणि ध्वनी प्रदुषण आहे. मी आता एक ऑर्डर काढणार आहे की, जर्मन संगीतकार होता त्याने आपल्याकडे आकाशवाणीची एक ट्यून तयार केली होती. सकाळी साडेपाच वाजता ती ट्यून वाचायची. मी ती ट्यून शोधून काढली आहे आणि मी म्हटलं अ‍ॅम्ब्युलन्सवर ही ट्यून लावा. ती कानाचा लांगले वाटते."

First published:

Tags: Ajit pawar, Nitin gadkari, Pune